अहमदनगर, 15 जून :
अजित पवार यांचे विश्वासू राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी हैदराबाद येथील मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या निवासस्थानी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे श्रीगोंद्यात राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का बसला आहे.
गेल्या काही दिवसापुर्वी घनश्याम शेलार यांनी बीआरएस’चे प्रमुख व मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची हैदराबाद येथे पक्ष प्रवेशासंबधी भेट घेतली होती. त्या अनुशंगाने शेलार यांची बीआरएस पक्षात प्रवेश करणार होते, राव यांच्या पक्षाकडून निमंत्रण आल्याने शेलार आणि त्यांचे समर्थकनी हैद्राबादकडे रवाना होवून तेथील हॉटेल द पॅलेस येथे पाहुणचार घेतला. त्यानंतर आज शेलार यांनी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या पक्षात जाहीर प्रवेश केला.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी राव यांनी त्यांच्या पक्षाचा विस्तार महाराष्ट्रातही करण्यास सुरुवात केली आहे. नांदेड, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अनेक पदाधिकाऱ्यांनी केसीआर यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश घेतला होता. दरम्यान, आता थेट राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षानेच केसीआर यांच्या पक्षात प्रवेश केलाय. शरद पवार यांचे विश्वासू असलेल्या घनश्याम शेलार यांच्या बीआरएस प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
हे सुध्दा वाचा
अजितदादा पवार नंदुरबारात … मेळाव्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन – MDTV NEWS
नंदुरबारात ९ वर्षात विकासाला गती : कोट्यवधींची कामे – MDTV NEWS
शिरपूर तालुका पोलीस : अवैध मद्य वाहतूक करणारे वाहन ताब्यात .. MDTV NEWS
घनश्याम शेलार यांना 2019च्या विधानसभा निवडणुकीत थोडक्यात पराभूत व्हावं लागलं होतं. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी त्यांचा पराभव केला होता. अवघ्या ७५० मतांनी घनश्याम शेलार यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आता आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षांकडून चाचपणी सुरू झाली असतानाच घनश्याम शेलार यांनी बीआरएसमध्ये केलेल्या प्रवेशाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
घनश्याम शेलार यांनी युवा मोर्चाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. तिथून भाजपमध्ये आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उमेदवारीच्या मुद्द्यावरून त्यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला होता. शिवसेनेतून बाहेर पडत ते वंचित बहुजन आघाडीत गेले होते. त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादीत घरवापसी केली होती. गेल्या विधानसभेला राहुल जगताप यांनी विधानसभा लढण्यास नकार दिल्यानंतर शेलार यांना उमेदवारी मिळाली होती.
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,अहमदनगर