शिंदखेडा येथे वृत्तपत्र व पत्रकार यांच्या न्याय मागण्यांबाबत शासनाला निवेदन
शिंदखेडा :- वृत्तपत्र व पत्रकारांच्या न्याय मागण्यांबाबाबत तहसीलदारांमार्फत शासनास निवेदन सादर करून आंदोलन करण्यात आले. व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेमार्फत आज (११ मे ) रोजी देशव्यापी व महाराष्ट्रभर धरणे व निवेदन देण्याचा संकल्प होता. सदर निवेदन शिंदखेडा तालुका पत्रकार संघटनेमार्फत आज शिंदखेडा तहसीलदार यांना देण्यात आले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
निवासी नायब तहसीलदार बन्सीलाल वाडीले यांनी निवेदन स्वीकारले. सदर निवेदनात एकूण प्रमुख सहा मागण्या नमूद केल्या आहेत. पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्यास भरीव निधी द्यावा, पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती देण्यात यावी, वृत्तपत्रांना जाहीरातीवर लागू असलेला जीएसटी रद्द करावा, पत्रकार निवासासाठी विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा, कोरोनात जीव गमावलेल्या फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे, शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके ( लघु दैनिके) यांना मारक आहे. लघु दैनिकानाही मध्यम ब वर्ग दैनिकांप्रमाणे जाहिराती देण्यात याव्यात. तर पत्रकारांच्या खाजगी वाहनांना टोलमधून सूट देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
यावेळी शिंदखेडा तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रा.प्रदीप दीक्षित, कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील, प्रकाश चौधरी, आर.ओ.पाटील, दोंडाईचा येथील आखतर शाह, यादवराव सावंत, चंद्रकांत डागा, विनायक पवार, संजय महाजन, जितेंद्र मेखे, अशोक गिरनार, राका पवार, प्रा.भैय्या मंगळे, प्रकाश चौधरी आदी उपस्थित होते.
यादवराव सावंत. एम.डी.टी.व्ही. न्युज, शिंदखेडा.