नंदुरबार :- श्रीराम नवमीच्या मुहूर्तावर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळातर्फे सेतू सुविधा केंद्राचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. ना नफा-ना तोटा या तत्त्वावर सेतू केंद्रात शासकीय माफक फी मध्ये कामे केली जाणार आहेत.
नंदुरबार शहरातील लोकनेते स्व. बटेसिंग रघुवंशी व्यापारी संकुलात सेतू सुविधा केंद्राची सोय करून देण्यात आलेली आहे. शासकीय योजनांच्या लाभासाठी नागरिकांना नेहमी अडचणी निर्माण होत असतात. त्यामुळे त्यांना मार्गदर्शन व्हावे व लाभ मिळावा यासाठी आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून लोकनेते बटेसिंग रघुवंशी व्यापारी संकुलात सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात आले.
याप्रसंगी शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील,माजी नगरसेवक परवेज खान, रविंद्र पवार, शहर प्रमुख विजय माळी,अर्जुन मराठे,जगन्नाथ माळी,चेतन वळवी,दिलीप बडगुजर,नितीन जगताप, प्रकाश पाटील,योगेश चौधरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्यवस्थापक राकेश खलाणे, पवन रघुवंशी,विश्वजीत पाडवी,प्रसाद तारगे,अमर वळवी,जितेश शर्मा आदींनी परिश्रम घेतले.
शासकीय योजनांच्या लाभासाठी प्रयत्न करणार;माजी आ. चंद्रकांत रघुवंशी
यावेळी माजी आमदार तथा शिवसेनेच्या शिंदे गटाचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी म्हणाले,शासकीय माफक फी मध्ये सेतू सुविधा केन्द्राची सुरवात करण्यात आली असून,याठिकाणी आधार कार्ड संबंधित कामे, रेशन कार्ड, मतदान कार्ड, श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजना, बालसंगोपन योजना, जातीचा दाखला, पॅन कार्ड, विवाह नोंदणी, पीएम किसान, गॅजेट सर्टफिकेट, ई श्रम कार्ड इ. कामे केले जातील व इतर शासकीय कामासाठी मार्गदर्शन केले जाईल कार्यकर्त्यांनी फ़क्त कागदपत्र सेतू केन्द्रावर आणून द्यावे त्या नंतर सेतू केंद्र व आमदार कार्यालय सर्व कामांचा पाठपुरावा करुन दाखले व पात्र प्रकरण मंजूर करुन देण्यात येतील.
प्रविण चव्हाण ,एम. डी. टीव्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी ,नंदुरबार.