पोलिसांना कर्तव्य पार पाडत असताना स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देऊन व्यायाम करुन आपले आरोग्य उत्तम ठेवणे आवश्यक असते.
यासाठी नंदुरबार पोलीस दलातील शहादा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, अंमलदार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी जून पोलीस ठाण्यात आंबेडकर पुतळा शेजारी व्यायाम शाळा सुरु करण्यात आली आहे. या व्यायाम शाळेचे उद्घाटन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
हे पण बघा : – पुन्हा एकदा मुघलांवर स्तुतिसुमने…,जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य….!
यावेळी पोलीस अधीक्षक पी. आर पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक निलेश पी.तांबे,शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, शहाद्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे,यांच्यासह सारंगखेडा, म्हसावद या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
ही वाचली का ? – पिंपळनेर :- घरफोडी करणारी टोळी अखेर जेरबंद
जनतेची सुरक्षा हे पोलिसांचे कर्तव्य असून त्यासाठी पोलीस दिवसरात्र मेहनत करुन आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असतात. पोलिसांनी जनतेच्या सुरक्षेसोबतच स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देवून व्यायाम करुन आपली शरीरयष्टी उत्तम ठेवणे गरजेचे आहे.
मात्र, रात्रगस्त गुन्हयाचे तपासासाठी बाहेर गावी जाणे, बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त अशा अनेक काणांमुळे पोलिसांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे पोलिसांना वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी होऊन अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
म्हणून या व्यायाम शाळेचा उपयोग करून पोलिसांचे आरोग्य सुदृढ होईल.
MDTV साठी संजय मोहिते,शहादा प्रतिनिधी