Sharad Pawar :शरद पवार हेच…. भुजबळांचं सूचक वक्तव्य ..

0
326

नाशिक -२०/६/२३

शरद पवार[Sharad Pawar] हेच आमच्या मनातील पंतप्रधान आहेत, पण त्यांना पीएम पदापासून हुलकावणी मिळाली असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलं आहे. शरद पवार हे पंतप्रधानपदासाठी योग्य व्यक्ती आहेत. शेती, बेरोजगारी, आणि प्रशासन अशा अनेक क्षेत्रांचा त्यांना दांडगा अभ्यास आहे. विविध क्षेत्रांमध्ये निर्माण झालेल्या समस्यांमधून मार्ग कसा काढावा याचा त्यांना मोठा अनुभव आहे. त्यांच्या सारखा दुसरा नेता नाही, असं छगन भुजबळ[Chhagan Bhujbal] यांनी म्हटलं.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

शिंदे, फडणवीस सरकारवर निशाणा 

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.  मंत्रिमंडळ विस्तार होणार असं आपण गेल्या वर्षभरापासून ऐकत आहोत. जाहिरातीच्या माध्यमातून कलगीतूरा लागला आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा जाहिरात द्यायची वेळ आली. हे सगळं कोण करत आहे याची कल्पना नाही.  यामुळे कार्यकर्ते दुखावले जात आहेत. काम बाजुला राहतं असल्याचा टोला भुजबळ यांनी लगावला आहे.

हे सुध्दा वाचा

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS

फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS

म्हसावद पोलिसांनी रोखला पिप्राणी येथील बालविवाह !

देशमुखांना टोला 

आशिष देशमुख हे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. याबाबत भुजबळांना विचारले असता त्यांनी देशमुखांना जोरदार टोला लगावला आहे. दिल्या घरी सुखी राहा, दुसरे आणखी काय बोलणार असं भुजबळ यांनी म्हटलं 

तेजस पुराणिक ,जिल्हा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्युज ,नाशिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here