मुंबई :१०/३/२०२३
राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. यात सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी मानून 300 कोटींची तरतूद करून 10 महत्वाचे निर्णय या बजेट मध्ये घेतले आहेत.
देशात व राज्यात महागाईने सामान्य जनता होरपळून निघते आहे. महागाई मुळे सामान्य जनतेचे आर्थिक नियोजन कोलमडले असून त्यांना दिलासा मिळावा म्हणून राज्यसरकारने भरीव निधीतून त्यांना सावरण्यासाठी 10 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामुळे सामान्य जनतेला काहीसा दिलासा मिळणार आहे.
- काय आहेत हे 10 निर्णय
- राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये सन्मान निधी दिला जात होतो
तो निधी आता 12 हजार करण्यात आला आहे - राज्यात 75 वर्षावरील नागरिकांना मोफत तर 65 वर्षावरील नागरिकांना 50 टक्के सवलतीने बस प्रवास सुविधा देण्यात आली होती
या अर्थसंकल्पात प्रत्येक वयोगटातील महिलांना 50 टक्के बस प्रवासात सवलत देण्यात आली आहे - महात्मा फुले जनआरोग्य योजनेत यापूर्वी दीड लाखाची तरतूद करण्यात आली होती. मात्र आता या योजनेतून 5 लाखापर्यंत मोफत उपचार सुविधा देण्यात आली आहे
- संजय गांधी योजनेत 500 रुपयांची वाढ करून दरमहा दीड हजार रुपये देण्यात येणार आहेत
- शेतकऱ्यांच्या बळकटीकरणासाठी मागेल त्याला शेततळे, ठिबक सिंचन, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर आदी योजनांचा सामावेश करण्यात आला आहे
- इतर मागासवर्गीय यांच्यासाठी 3 वर्षात 10 लाख घरांची ‘मोदी आवास घरकुल योजना‘ राबविण्यात येणार आहे.
- शालेय विद्यार्थ्यांना भरीव शिष्यवृत्ती, गणवेश मोफत देण्यात येणार आहे
- मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना‘ सुरू करण्यात आली आहे
- राज्यातील शेतकऱ्यांना 1 रुपयात पीकविमा देण्यात येणार आहे
- शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपती यांच्या जीवनावर संग्रहालय उभारण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
संकलन /लेखन : जीवन पाटील कार्यकारी संपादक ,एम डी टी व्ही न्यूज नंदुरबार ,तेजस पुराणिक जिल्हा प्रतिनिधी,नाशिक ,एम डी टी व्ही न्यूज
आणि मुंबई ब्युरो एम डी टी व्ही न्यूज …