नंदुरबार : ७/३/२०२३
शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेना पदाधिकाऱ्यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली..
त्याबाबतचे नियुक्तीपत्र संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी दिलं..
या तालुक्यातील तीन ते शहाद्यातील एका पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे..
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कराहे देखील वाचा:
नंदुरबार येथील पंकज चौधरी यांची उपजिल्हा संघटक, आसाने ग्रामपंचायतचे माजी सरपंच युवराज पाटील उपजिल्हा संघटक, प्रफुल्ल खैरनार, तालुका संघटक, तर शहादा येथील पुष्पेन्द्र चौधरी यांची उपजिल्हा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली..
तुमचा कालावधी एका वर्षासाठी असेल..
हिंदुरुदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा सक्रियपणे प्रचार आणि प्रसार करावा
तसेच पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करावं असं शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी स्वाक्षरीच्या नियुक्ती पत्रात म्हटलंय..
हे हि पहा :https://bit.ly/3IT2s76
उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी मार्गदर्शन केलं..
यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख एडवोकेट राम रघुवंशी, माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, माजी नगरसेवक दीपक दिघे, राजेंद्र पेंढारकर, सागर चौधरी, छोटू पाटील यांच्यासह आत्माराम नगराळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..
प्रवीण चव्हाण नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही न्यूज

