शिंदे फडणवीस सरकारच्या आधी होतं महाविकास आघाडीचे सरकार.. या काळात विविध समित्या तयार करण्यात आल्या होत्या..
मात्र सरकार बदललं की मागील सरकारचे ही केलेले निर्णय रद्द करण्याची परंपरा आता महाराष्ट्रात सुरू झाली आहे.. मात्र विद्यमान सरकारमधील उपमुख्यमंत्री तथा वर्धेचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय गांधी निराधार समितीची यादी नुकतीच जाहीर केली महाविकास आघाडी काळातील सर्व समित्या रद्द करण्यात आल्या..
या सर्व समित्यांवर नवीन नियुक्ती संदर्भात 40 60 असा फॉर्म्युला ठरवण्यात आला होता.. परंतु यादी जाहीर केल्यावर शिंदे गटातील कोणत्याही पदाधिकाऱ्यांचे नाव त्यात नव्हतं.. त्यामुळे शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या..
यादी जाहीर केल्यानंतर शिंदे गटाच्या एकालाही स्थान न देण्यात आल्यानं शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला.. अनेक पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत दिसून येते… त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं असं म्हणणं वावगे ठरू नये…
ब्युरो रिपोर्ट एमडी टीव्हीन्यूज वर्धा