शिंदखेडा /धुळे -२१/७/२३
शिंदखेडा तालुक्यातील वाघोदा येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी प्रशासनाला गेल्या चार महिन्यापासून वेळोवेळी विविध मागणीसाठी निवेदन सादर करुन देखील दुर्लक्ष केल्याने गोराणे फाटा येथे 22 जुलैला चक्का जाम आंदोलन करणार असल्याचे निवेदन आज जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना भाजपा अनुसुचित जाती मोर्चा चे प्रदेश सचिव महेंद्र खैरनार यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
सदर निवेदनातून दि. 17-3-23 व 17-4-23 आणि 21-6-23 रोजी निवेदनातून सदरील मागणी व कारवाई करण्यात यावी असे असताना सदरील सदरील अवजड वाहनांच्या क्षमतेनुसार रस्त्याची व्यवस्था करण्यात यावी , ओव्हरलोड वाहतुकीवर प्रतिबंध घालण्यात यावा , स्थानिक युवकांना रोजगार, शेतकऱ्यांना थकीत मोबदला देण्यात यावा , महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे नियम डावलून रात्रंदिवस बेकायदेशीर सुरु असलेले सिमेंट उत्पादन थांबविणेबाबत , वायु प्रदुषण , जल प्रदूषण , ध्वनी प्रदूषण , थांबविणेबाबत आदी संदर्भात वेळोवेळी निवेदन सादर केले आहेत.
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
परंतु आजपावेतो जिल्हा प्रशासनाने अथवा अल्ट्राटेक सिमेंट कंपनी प्रशासनाने कोणताही ठोस निर्णय न घेता आम्हाला केराची टोपली दाखविली आहे. अल्ट्राटेक सिमेंट कंपनी प्रशासना विरोधात आम्ही समस्त ग्रामस्थ गोराणे , माळीच , वाघोदा आणि परिसरातील सुशिक्षित बेरोजगार युवक व शेतकरी दि. 22 जुलैला सकाळी दहा वाजता गोराणे फाटा येथे चक्का जाम आंदोलन करणार आहोत.
तरी जिल्हा प्रशासन , पोलीस प्रशासन , अल्ट्राटेक सिमेंट कंपनी प्रशासनाने नोंद घ्यावी. तसेच पुढील होणाऱ्या परिणामास शासन व प्रशासन जबाबदार राहील. हयावेळी भारतीय जनता पार्टी चे अनुसुचित जाती मोर्चा चे प्रदेश सचिव महेंद्र खैरनार ( होळ ) दिनेश कदम ( गोराणे ) महेंद्र देसले ( माळीच ) विशाल पाटील ( वाघोदा ) आदिंसह युवक व शेतकरी उपस्थित होते .
यादवराव सावंत ,शिंदखेडा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज .. धुळे ..