शिंदखेडा /धुळे -२५/७/२३
शिंदखेडा तालुक्यातील कुंभारे गावशिवारात कापुस पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. मात्र गावशिवारात कापसावर लाल्या व मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसुन येत आहे. म्हणुन शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे कृषी विभागामार्फत केलेल्या आवाहनानुसार विविध प्रकारचे महागड्या औषधाची फवारणी करून देखील कापुस पिकांवर लाल्या व पिकांची वाढ खुंटलेली आहे.
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0
हे हि वाचा : https://tinyurl.com/2uy69prr
TALODA : मणिपूर घटनेचे पडसाद : तळोद्यात विविध संघटनांनी काढला निषेध मोर्चा ..
कुंभारे गावशिवारातील संपुर्ण गावातील शेतकऱ्यांचे कापसावर लाल्या रोग पडला असल्याचे शेतकरी हरपालसिंग खुमानसिंग गिरासे हे म्हणाले की, माझ्या चार एकर शेतीतील सर्वच कापसावर लाल्या व मर रोग आला आहे. यांच्या सह अनेक शेतकऱ्यांनी कैफियत मांडली. शासनाच्या धोरणानुसार कापसाची लागवड जुन महिन्यात करावा सल्ला दिल्याने ती बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली होती. काही दिवसांपासून कापसावर लाल्या व रोगाचा प्रादुर्भाव दिसुन आल्यावर शेतकरी चिंतातुर असुन आर्थिक संकटात सापडला आहे.
मागील वर्षीपासून कापसाला योग्य भाव न मिळाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरात पडुन आहे. म्हणुन शासनाने कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना हया बाबत योग्य मार्गदर्शन करावे अशी शिवसेना युवासेना जिल्हा सरचिटणीस मयुर संजय कदमबांडे यांच्या सह शेतकऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.
यादवराव सावंत ,प्रतिनिधी ,शिंदखेडा ,एम डी टी व्ही न्यूज ..