मागण्या मान्य होईस्तोवर उपोषण करण्याचा इशारा
शिंदखेडा :- शेतकऱ्यांच्या मालाला खर्चाच्या दीडपट हमी भाव द्यावा, स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्यात व शेतकऱ्यांना शेती पंपासाठी १८ तास दिवसाला वीजपुरवठा करावा, शेतकऱ्यांचा ७/१२ उतारा कोरा करुन बँक व विजवितरण कंपनीचे सक्तीचे वसुली थांबवावी यासह विविध मागण्यांसाठी शिंदखेडा तहसिलसमोर शानाभाऊ सोनावणे व रावसाहेब ऐशी यांनी उपोषण सुरु केले आहे.
शिंदखेडा तहसील कार्यालयासमोर आजपासून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी व विविध प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी शिवसेनेचे ( उबाठा ) धुळे उपजिल्हा प्रमुख तथा शेतकरी नेते शानाभाऊ सोनवणे व रावसाहेब ईशी यांनी सुरु केलेल्या उपोषणाला विविध संघटना व शेतकऱ्याचा पाठींबा मिळत आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
शानाभाऊ सोनवणे व रावसाहेब ईशी यांनी शिंदखेडा तहसील कार्यालयासमोर गेल्या २६ जानेवारीला बैलगाडीवर बसून शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण केले. त्यावेळी प्रभारी तहसीलदार आशा गांगुर्डे यांनी आचारसंहिता असल्याचे कारण देत उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांच्या संदर्भात १२ मागण्या विषयी चर्चा करून मार्ग काढला जाईल या लेखी स्वरूपातील पत्रकान्वये तुर्तास उपोषण मागे घेतले होते.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
मात्र तीन महिण्यांचा कालावधी उलटल्यानंतर साधी एक बैठक घेतली गेली नाही. प्रशासनावाच्या उदासीनतेमुळे शानाभाऊ सोनवणे व रावसाहेब ईशी यांनी आजपासून ( दिनांक १५ ) तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१७ मध्ये केलेल्या घोषणेनुसार २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार त्या संदर्भात केंद्र सरकारने कोणतीही उपाययोजना केल्या नाहीत. त्यात उपाययोजना करुन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढवावे.
शिंदखेडा तालुका व मतदारसंघ पोकरा योजनेत समाविष्ट करण्यात यावा, कापसाला बारा हजार रुपये हमी भाव द्यावा, पिक विमा योजनेचा लाभ देताना महसूल मंडळ हा घटक निकष न लावता वैयक्तिक शेतकरी निकष लावावेत, शेतकऱ्यांना सुटसुटीत पद्धतीने पी.एम.किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत, जलयुक्त शिवार योजनेत तापी काठावरील जास्तीचे पाणी वाहून येणारे शेताबाहेर काढण्यासाठी चर काढणे या बाबीला मंजुरी मिळावी, नरडाणा एमआयडीसी च्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर मारलेला शिक्का तात्काळ हटवा व जमीनीचा मोबदला संपादित करावा.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील सौर ऊर्जा प्रकल्पाविषयी सरकारने भुमिका स्पष्ट करावी, वाडी शेवाडे धरणाचे व पाटचारीचे पाणी पाझंरत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तात्काळ दखल घेऊन पाटचारीत गेलेल्या जमीनीचा मोबदला मिळावा, प्रकाशा बुराई उपसा सिंचन योजना तात्काळ मार्गी लावावी, रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीरींना मंजुरी देऊन अनुदान वितरित करावे, तापी काठावरील बंद पडलेल्या उपसा सिंचन योजना तात्काळ कार्यान्वित कराव्यात, पांझरा नदीवरील बेटावद जवळील केटी वेअर बंधाऱ्यांची तात्काळ दुरुस्ती करून त्याचप्रमाणे अजंदे गावाजवळील पाटचारी दुरुस्ती करावी, आदी मागण्यांसाठी सोनावणे व ईशी उपोषण करीत आहेत.
दरम्यान, सायंकाळी चार वाजता तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे व पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांनी उपोषण कर्त्याची भेट घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक गुरुवारी घेऊन यावर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले. उपोषणकर्ते शानाभाऊ सोनवणे यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी साहेबांना उपोषणस्थळी बोलवा. मागण्या रास्त पद्धतीने सुटतील तरच उपोषण मागे घेतले जाईल, असे सांगून उपोषण सुरु ठेवले आहे.
यादवराव सावंत. एम.डी.टी.व्ही. न्युज शिंदखेडा.