शिंदखेडा : तालुका क्रीडा संकुलचा तिढा सोडवा अन्यथा…उपोषण

0
171

शिंदखेडा येथील शहराच्या मंजूर विकास आराखड्यानुसार शिंदखेडा गट क्रमांक ११९० मधे तालुका क्रीडा संकुलाची जागा हस्तांतरणाबाबतचे निवेदन माजी प्रभारी नगराध्यक्ष दीपक देसले यांच्या वतीने तहसीलदार शिंदखेडा यांना देण्यात आले. मंजूर असलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या जागेच्या हस्तांतरणाच्या बाबतीत तब्बल सहा महिन्यांपासून जिल्हा अधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांना पाठपुरावा नित्याने सुरु आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

मात्र, शिंदखेडा शहराचे क्रीडा संकुल हे कदाचित जागेच्या अभावी व शासनस्तरावर त्रुटी दाखवून दुसऱ्या शहरात स्थलांतरित करण्याचा डाव तर नाहीना? ही भीती सर्वसामान्य जनतेच्या मनात असल्याकारणाने शिंदखेडा शहराच्या हक्काचं तालुका क्रीडा संकुल हे शिंदखेडा शहरालाच मिळायला हवे, यासाठी दिनांक शिंदखेडा तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना स्मरणपत्र देऊन पाठपुरावा करण्यात आला.

GOOD NEWS… लिटरमागे १० रुपयांनी स्वस्त झाले – MDTV NEWS

BIG BREAKING… मविआ नेते खा.शरद पवार व खा.संजय राऊत यांना धमकी – MDTV NEWS

ब्रेकिंग -उद्धव ठाकरेंना शिंदेंचा जबरदस्त झटका .. सेना भवनाला सुरुंग.. – MDTV NEWS

शिंदखेडा तालुका क्रीडा संकुलाच्या जागेचा तिढा लवकरात लवकर सोडवावा अशी विनंती या स्मरणपत्रातून करण्यात आली आहे. सदर जागेचा तिढा लवकर न सोडवल्यास तालुक्यातील क्रीडाप्रेमी नागरिकांसह आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी शिंदखेडा नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष दीपक देसले, नगरपंचायतीचे माजी विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, काँग्रेसचे शहराध्यक्ष दिनेश माळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण पाटील, किरण महंत, समद शेख, ॲड.निलेश देसले उपस्थित होते.

यादवराव सावंत. एमडी.टीव्ही. न्युज शिंदखेडा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here