वृक्ष संवर्धन समितीच्या पाच वर्षाच्या कार्याचे फलित !
शिंदखेडा :- येथील तरुणांच्या पाच वर्षाच्या परिश्रमानंतर शिंदखेडा शहर शेकडो वृक्षांनी बहरले आहे. एक हजार लावलेल्या रोपांपैकी ९०० पेक्षा अधिक रोपांचे संवर्धन या तरुणांनी केले आहे. शिंदखेडा शहरात पाच वर्षांपूर्वी काही तरुणांनी एका ध्येयाने एकत्र येऊन वृक्ष संवर्धन समितीची स्थापना केली. या समितीच्या माध्यमातून वृक्ष लागवड करून संवर्धन करण्याचे काम हाथी घेतले आणि बघता बघता शिंदखेडा शहर व परिसर शेकडो वृक्षांनी बहरले आहे.
समितीचे अध्यक्ष योगेश चौधरी, जीवन देशमुख, रोहित कौठळकर, राजेंद्र मराठे, भूषण पवार, महेंद्र यादगीरिवार, गजानन बडगुजर, दिपक मराठे, यश मराठे, प्रदीप चतुर्वेदी, रमाकांत बागुल, चेतन बागुल या तरुणांनी आपापले व्यवसाय सांभाळून वृक्ष लागवडीचे काम हाथी घेतले. रस्त्याचा दुतर्फा, गार्डनमधील मोकळ्या जागेत, अमरधाम, शहरातील मंदिर अश्या ठिकाणी वृक्षांची लागवड करून संवर्धन केले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
यात निंब, वड, पिंपळ, सिसम, शिवन, चिंचोडा, जांभूळ, आवळा, पयास, करंज, बदाम, आपटेसह आदी झाडांचा समावेश आहे. या पाच वर्षाच्या काळात वृक्ष लागवड, रोपांचे संगोपन करत असतांना अनेक अनुभव आले. वृक्ष लागवड करण्यापेक्षा संवर्धन करणे खूप जिकरीचे आहे. रोप लागवड करून दोन वर्षा पर्यंत लहान मुलांप्रमाणे देखभाल करावी लागते. वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने लागवड केलेल्या अनेक रोपांची वेगवेगळ्या कारणांमुळे नुकसान झाले आहे. रोपांसाठी लावलेल्या संवर्धन जाळी ( पिंजरे) देखील चोरून नेणे. हेतुपुरस्सर लागवड केलेल्या रोपांचे नुकसान करणे. लावलेल्या रोपांना जाळण्याचा प्रयत्न करणे काही. या सर्व समस्यांना सामोरे जाऊन वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने वृक्षांची देखभाल ठेऊन काळजी घेण्यात आली.
चिमुकल्यांमध्ये वृक्ष संवर्धनाची आवड निर्माण झाली !
वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने नियमित झाडांना पाणी दिल्याचे पाहून चिमुकल्यामध्ये देखील झाडांना पाणी देण्याची आवड निर्माण झाली. सुट्टीच्या दिवशी सर्व चिमुकले एकत्र येऊन रोपांना पाणी देण्याचे निःस्वार्थ काम करत असत. लहान मुलांमध्ये बाल वयातच वृक्ष लागवड करून संवर्धन करण्याचे काम वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
तरुणांनी वृक्ष संवर्धनाच्या कार्यात सामील व्हावे : अध्यक्ष योगेश चौधरी
वृक्ष संवर्धन कार्य एका व्यक्तीचे किंवा एका समितीचे नाही. ही खूप मोठी चळवळ आहे. यात तरुणांचे योगदान खूप मोलाचे आणि महत्वाचे आहे. वृक्ष संवर्धनाविषयी तरुणांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना सोबत घेऊन वृक्ष लागवड करण्यात येते. वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने इयत्ता १० वी, १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाकडून वृक्ष लागवड करण्यात येते. वाढदिवसाला किमान एक वृक्ष लागवड करण्याचे आवाहन करण्यात येते. या माध्यमातून तरुणांकडून वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धन कार्यात सामील होण्याचे आवाहन करण्यात येते असल्याचे श्री.चौधरी यांनी सांगितले.
यादवराव सावंत. एम.डी.टी.व्ही. न्युज, शिंदखेडा.


