राहुल भोई खून प्रकरणातील संशयीतास अटक करण्यात शिरपूर पोलिसांना आलं यश..

0
154

शिरपूर,धुळे:१५/०२/२०२३

4 फेब्रुवारी रोजी राहुल भोई या तरुणाचा धारदार शस्त्रानं खून करण्यात आला. आणि नंतर सारं शिरपूर हादरलं!

rahul bhoi news shirpur

ही घटना घडली होती 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास.. या घटनेनंतर शिरपूर शहर पोलिसांनी चंग बांधला.. सात संशयतांना ताब्यात घेण्यात त्यांना यश आलं होतं.. तर आठव्या संशयताच्या देखील मुस्क्या त्यांनी आवळल्या..

त्यामुळे शिरपूर पोलिसांच्या या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त होतय. नुकताच आठव्या संशयताला त्यांनी ताब्यात घेऊन त्याला अटक केली. इतर संशयीतांची धुळे कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. 16 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता या खून प्रकरणात एकूण संशयतांची संख्या आठ वर पोहोचली आहे.

या प्रकरणातील अन्य फरार आरोपींचा शोध शिरपूर पोलीस घेत आहेत. लवकरच अन्य फरार संशयता नाही ताब्यात घेण्यात शिरपूर पोलिसांना यश येईल हीच आशा करूया..

नवल कढरे शिरपूर तालुका प्रतिनिधी एम डी टीव्ही न्यूज

naval kadhre shirpur taluka reporter

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here