शिरपूर :१८/२/२३
शॉर्ट हेडलाईन
1 19 वर्षे युवतीवर केला पंचवीस वर्षीय चुलत आते भावाने अत्याचार
2 संशयीता विरुद्ध शिरपूर पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल
3 शिरपूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
एकीकडे महिला, तरुणी, विद्यार्थिनी सुरक्षित आहे असा गवगवा केला जातो. तर दुसरीकडे त्यांच्यावर बळजबरीने अत्याचार करण्याच्या घटना घडण्याच्या प्रमाणात वाढ होताना दिसते..
हि पहा सविस्तर बातमी :https://youtu.be/U1AsSp_D-0M
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कराहे देखील वाचा:
नात्यालाच काळीमा फासण्याचा प्रकार शिरपूर शहरातून उघड झाला..
25 वर्षीय चुलत आते भावाने आपल्या नात्यातीलच 19 वर्षे युवतीवर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली. यामुळे नात्याला काळीमा फासण्याचा प्रकार समोर आला आहे.. सदर युवतीच्या आजोबांचं नुकतच निधन झालं. त्यांच्या घरी आयोजित एका धार्मिक कार्यक्रमासाठी या युवतीचं येणं जाणं सुरू असायचं.
नात्याने असलेला हा चुलत आते भाऊ देखील तिथे यायचा. या संधीचा फायदा या संशयिताने घेतला. सदर तरुणी जिन्यावर बसलेली असताना संशयीताने गहू उपासणेच्या बहाण्याने माझ्याशी लवशिप करते का असं विचारलं.
तेव्हा तिने साफ इन्कार केला.. तेव्हा संशयिताने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास मारण्याची त्याने धमकी दिली.
याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात मुलीच्या फिर्यादीवरून संशयितांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला… पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे करताय. या संशयिताला न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी त्याला सुनावण्यात आली. यामुळे समाज मन हादरलं..
नवल कढरे, तालुका प्रतिनिधी एम.डी. टी.व्ही न्यूज शिरपूर

