नेर: धुळे तालुक्यातील उभंड- पिंपरखेड येथे एकाची पिस्तूलने गोळी झाडून तसेच चाकूने गळा चिरुन निर्घृण हत्या केल्याची घटना काल रात्री ९ वाजेदरम्यान घडली आहे. या घटनेमुळे धुळे शहरात एकाच खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.
धुळे शहरातील साक्री रोड परिसरात असलेल्या मिलिंद सोसायटी येथे राहणारे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे शहर अध्यक्ष यशवंत बागुल हे त्यांच्या शेतीच्या कामासाठी धुळे तालुक्यातील उभंड येथे गेले होते. शेतातील डाळिंबाच्या झाडांना बांबू लावण्यासाठी आणि मजूर शोधण्यासाठी त्यांचा मामाचा मुलगा व यशवंत बागुल हे शेजारी असलेल्या पिंपरखेड या गावी जाऊन परत येत असताना दोन अज्ञात इस्मानी त्यांना उभंड – पिंपरखेडे रस्त्यावरील बारी घाटात थांबवून त्याच्याशी चर्चा करीत असताना त्यांच्यावर पिस्तूलने गोळी झाडत तर दुसऱ्या इसमाने चाकूने छातीवर व गळ्यावर वार करत यशवंत बागुल याची निर्गुण हत्त्या केला आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
यासंदर्भात यशवंत बागुल यांची पत्नी यांच्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात्तांविरोधात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस मारेकऱ्यांचा कसून शोध घेत आहेत. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला यशवंत बागूल याचा मृतदेह तसेच जवळच पिस्तूलचे मॅगझिन, गोळीचा भाग मिळून आला. घटनास्थळाचा पंचनामा व नमुने घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
नेमके हत्येमागचे कारण कळू शकलेले नाही. यशवंत बागूल हा त्याच्या मामाच्या मुलासोबत उभंड- पिंपरखेड रस्त्याने जात असतांना अचानक यशवंत बागूल याच्यावर मारेकऱ्यांनी हल्ला केला त्यात यशवंत बागुल ह्याचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती धुळे तालुका पोलिसांना मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळाकडे रवाना होऊन सदर घटना स्थळाची पाहणी करून यशवंत बागुल यांचा मृतदेह धुळे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. यशवंत बागुल यांची हत्या का करण्यात आली? आणि या हत्यामागे कोण आहे? त्याचा तपास पोलीस करीत आहे.
दिलीप साळुंखे. एम.डी.टी.व्ही. न्युज धुळे.