धक्कादायक : तिनटेंबा येथे एकच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

0
350

नवापूर : – मोटारसायकल घेऊन दिली नाही या किरकोळ कारणावरून नवापूर शहरातील तीनटेम्बा परिसरातील एकाच कुटुंबातील तीन व्यक्तीनी आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. वडील, मुलगा व सून यांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याच्या या घटनेने तिनटेंबा परिसरासह संपूर्ण नवापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून शोककळा पसरली आहे.

dbd1442b d14c 446f 884c 70ef509b7708

याबाबत पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, नवापूर शहरातील नगर परिषद हद्दीतील तीनटेंबा परिसरातील सावंन सैय्यद गावित (वय २१), त्यांची पत्नी रोशनी सावत गावित आणि वडील सैयद कर्मा या तिघांनी रात्री ११ ते १ वाजेच्या सुमारास रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली. नवीन दुचाकी घेण्याच्या वादातून सदर घटना घडली असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

SPONSORED CONTENT

रात्री ११ वाजेच्या सुमारास सावंन सैयद गावीत (वय २१) व त्यांची पत्नी रोशनी गावित यांनी फुलफळी भागातील रेल्वे रुळावर आत्महत्या केल्याचे समजताच, वडिलांनीही रात्री एक वाजेच्या सुमारास रेल्वेखाली आत्महत्या केली. सदर वृत्त गावात वाऱ्यासारखी पसरले. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सकाळी तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नवापूर उपजिल्हारुग्णालयात आणले. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ, युवराज परदेशी, विकी वाघ, योगेश थोरात, प्रताप वसावे करीत आहेत.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नवापूर, नंदुरबार.

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here