नंदुरबार : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने नंदुरबार जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. गुजरात राज्यातील बडोदा येथून विनापरवाना येणारे ११ लाख किमतीचे ८५७ पाकीट कापूस बियाणे कृषी विभागाच्या भरारी पथकाने सापळा रचून पकडले आहे. हि कारवाई नंदुरबार – धुळे जिल्ह्यच्या सीमेवरील सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ही पहिलीच सर्वात मोठी कारवाई असून बोगस कापूस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर प्रमाणित नसलेली बियाणे कमी किंमत किंवा उधारीने देण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. राज्यात कृषी विभागातर्फे प्रमाणित बियाणे आहे त्या किमतीत विक्री व्हावे, यासाठी कृषी विभाग लक्ष ठेऊन आहे. यासाठी जिल्हा, तालुका स्तरावर पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तरी देखील काही महाभाग प्रमाणित नसलेले बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची दिशाभूल व फसवणूक करण्याच्या प्रयत्न करीत आहेत. अशीच कारवाई कृषी विभागाने करून बोगसबियाणे विक्री करणाऱ्यांना धक्का दिला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील सीमेवरील शहादा तालुक्यातील सारंगखेडा पोलीस ठाण्याअंतर्गत दि.२६ रोजी पाच वाजेच्या सुमारास जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक नरेंद्र पाडवी यांना विनापरवाना कापूस बियाणे खाजगी वाहनाने येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक नरेंद्र पाडवी यांनी विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितेंद्र पानपाटील व शहादा तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे, कृषी अधिकारी योगेश हिवराळे, अभय कौर यांनी पोलिसांच्या मदतीने सापळा रचला. वाहन (क्र.जीजे ६-पीसी ३५३२) अडविले असता वाहनचालक चंद्रकांत पांडूरंग माळी (रा.कळंबू, ता.शहादा) याने विनापरवाना बियाणे गुजरात राज्यातील बडोदा जिल्ह्यातून आणल्याचे कबुल केले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक विभाग, नाशिक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तानाजी खर्डे, जि. प. कृषी विकास अधिकारी प्रकाश खरमाळे तसेच तंत्र अधिकारी संजय शेवाळे यांच्यापरवानगीने पुढील कायदेशीर कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे. सदर वाहनात एकूण १३ पोते (८५७ पाकिटे) होते त्याची अंदाजीत किंमत ११ लाख असून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. कृषी विभागाने केलेल्या या कारवाईचे शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार.