सिधी /मध्य प्रदेश /महाराष्ट्र-6/7/23
मध्य प्रदेशातील एक थेट लाजिरवाणा व्हिडिओ समोर आला आहे.. येथे एका मध्य धुंद व्यक्तीने पायऱ्यांवर बसलेल्या आदिवासी तरुणावर लघवी केली.. आरोपी प्रवेश शुक्ला हा भाजपा आमदार केदार शुक्ल यांचा प्रतिनिधी असल्याचे बोलला जात आहे ..काँग्रेस भाजपवर हल्लाबोल करताय दरम्यान आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे..
या प्रकरणाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल सोशल मीडियावर होताच आदिवासी आणि विविध संघटनांमधून संतापाची लाट उसळली आहे.. मध्य प्रदेशातील सिधी या जिल्ह्यातील हा व्हिडिओ आहे.. ज्या आदिवासी माणसावर लघवी करण्यात आली त्याचे नाव पाले कोल असून तो सीधी जिल्ह्यातील करोंडी गावचा आहे .. मात्र हे प्रकरण पेटल्यानंतर भाजप आमदार केदारनाथ शुक्ला यांनी आरोपी त्यांचा प्रतिनिधी नसल्याचे स्पष्ट केलं..
केदारनाथ शुक्ला यांचा मुलगा गुरुदत्त शरण शुक्ला यांनी सांगितले की हा आरोपी भाजपचा कार्यकर्ता नाही आणि त्याचा आधीच राजीनामा घेण्यात आला होता दरम्यान मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी सिधि जिल्ह्यातील वायरल झालेल्या व्हिडिओची गांभीर्याने दखल घेतली आहे.. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल ..राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे..
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला सिधी जिल्ह्यातील एका आदिवासी तरुणावर लघवी करण्याच्या कृतीचा आणि अमानवीयतेचा व्हिडिओ समोर आणला आणि सोशल माध्यमांवर तो व्हायरल करण्यात आला . मात्र नेटिजन्सन त्याच्यावर तीव्र शब्दात रोष व्यक्त केलाय.. आदिवासी समाजातील तरुणांसोबत अशा घृणास्पद आणि अधोगतीला सुसंस्कृत समाजात स्थान नाही.. लघवी करणारी व्यक्ती भाजपशी संबंधित असल्याचे सांगण्यात येते असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी स्पष्ट केलंय.. त्यामुळे याचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटल्याचं पाहायला मिळालं .. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात विविध संघटना आणि वंचित बहुजन आघाडी या संघटनेकडून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं.. संबंधितावर कठोर कारवाई व्हावी त्याला कुठल्याही प्रकारची दोषमुक्तता करू नये ही मागणी या संघटनेने केली.. तहसील कार्यालयातून या संपूर्ण प्रकरणाचा आढावा आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे शहादा प्रतिनिधी संजय मोहिते यांनी … हा प्रकार अतिशय निंदनीय आहे अशा प्रकारे कुठल्याही समाजाच्या व्यक्तीवर अशा प्रकारचं कृत्य कोणीही करू नये ही बाब निषेधार्थ असून संबंधितावर मध्यप्रदेश शासनाने कारवाई करावी.. सदर इसमास मुक्त सोडल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने शहादा शहरात दिलाय..
जगन ठाकरेसह संजय मोहिते ,शहादा प्रतिनिधी, एम डी टी व्ही न्यूज …