ऑस्ट्रेलियात कॅच घेताना Shreyas Iyer ला दुखापत; ‘इंटरनल ब्लीडिंग’मुळे डॉक्टरांचे विशेष लक्ष!
टीम इंडियासाठी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर याला गंभीर दुखापत झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यरला तातडीने सिडनीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर सध्या आयसीयूमध्ये (ICU) उपचार सुरू आहेत. तपासणीत त्याला ‘इंटरनल ब्लीडिंग’ (Internal Bleeding) झाल्याचे निदान झाले आहे.
सध्याची स्थिती: डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेयसची प्रकृती आता स्थिर आहे. मात्र, पूर्णपणे बरे होऊन भारतात परतण्यापूर्वी त्याला रुग्णालयात किमान एक आठवडा राहावे लागणार आहे.
संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष आता श्रेयसच्या प्रकृतीकडे लागले आहे. आम्ही त्याच्या प्रकृतीबद्दलच्या ताज्या अपडेट्ससाठी संपर्कात आहोत.


