Shrirampur Shutdown : जिल्हा निर्मितीसाठी श्रीरामपूर बंद : सुशासित भविष्याच्या अपेक्षा शहरात पोलिसांनी केला कडेकोट पोलीस बंदोबस्त
नव्या जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी अनेक संघटनांनी आज श्रीरामपुरात बंद पुकारलाय
महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगर कडे बघितले जात
या जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी पुन्हा आता जोर धरू लागली आहे
जिल्हा प्रशासनाने शिर्डीत शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर केलं
श्रीरामपूर राहाता आणि शिर्डी या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत
परंतु या कार्यालयाचा विरोध करत जिल्ह्याच्या निर्मितीसाठी अनेक संघटना आता पुढे येऊ लागलेत
श्रीरामपूर शहराला श्रीरामपूर जिल्हा जाहीर करण्यात यावा अशी मागणी विविध संघटनांकडून केली जाते
याला सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा देखील दर्शवलाय
हे सुध्दा वाचा
“बिपरजाॅय”… नंदुरबारला धोका नाही …! – MDTV NEWS
फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS
मंत्रिमंडळ निर्णय : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १५०० कोटी रुपयांस मंजुरी
राज्यात सत्तांतर झालं आणि त्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने पाच जिल्ह्यांच्या विभाजनासाठी हालचाली वेगाने सुरू केल्या
त्यात महाराष्ट्रातील अहमदनगरचा देखील समावेश होता ..सध्या संगमनेर कोपरगाव शिर्डी आणि श्रीरामपूर यापैकी एका शहराच्या जिल्हा निर्मितीचे प्रयत्न शासकीय पातळीवरून सुरू असल्याची माहिती मिळत आहे
परंतु श्रीरामपूर तालुक्यातील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा निर्मितीची मागणी लावून धरली आहे
आता श्रीरामपूर शहरातील अनेक संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी आज श्रीरामपूर बंद पुकारला आहे त्याला शहरातून विविध व्यापारी आणि व्यावसायिकांचा जाहीर पाठिंबा देखील मिळत आहे त्यामुळे वाहतुकीसह व्यवसाय ठप्प झाले आहेत
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
मात्र या संपूर्ण बंदला श्रीरामपूरवासीयांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे
कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या पार्श्वभूमीवर शहरातील विविध ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
शिर्डी हे भाविकांसाठी धार्मिक स्थळ मानलं जातं म्हणून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय तिथे मंजूर करण्यात आलं परंतु श्रीरामपूर शहरातून त्याला मोठा विरोध होताना पाहायला मिळतोय
काँग्रेस भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष देखील श्रीरामपूरच्या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे समोर येत आहे
त्यामुळे एकूणच श्रीरामपूरची जिल्हा निर्मिती होण्यासाठी शिंदे फडणवीस सरकार नेमकं काय निर्णय भविष्यात घेतो याकडे पाहणे महत्त्वाचे ठरेल
तात्यासाहेब शेरकर, श्रीरामपूर प्रतिनिधी, एम डी टीव्ही न्यूज ,अहमदनगर