अक्कलकुवात कोब्रा जातीचे २ नाग तर १ धामणचे दर्शन

0
115

अक्कलकुवा शहरात दोन भारतीय कोब्रा जातीच्या नागांचे तसेच एक धामण जातीच्या सर्पाचे दर्शन अक्कलकुवा वासियांना घडले दर्शन. सर्पमित्र राहुल कढरे याने सहजरित्या शिताफीने या विषारी सापांना पकडून सातपुड्याच्या जंगलात सोडले. विषारी सर्वांना सर्पमित्राने ताब्यात घेतल्यानंतर परिसरातील नागरिकांनी भितिचा निःश्वास सोडला.

9f973bfa 6bbb 4c75 bf79 1bbc7218c129 1


अक्कलकुवा शहरात सोमवार हा शहरवासीयांना नागांचे दर्शन करणारा सोमवार ठरला. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शहरातील जैन मंदिर परिसरात आढळलेल्या भारतीय कोब्रा जातीच्या विषारी नागाला (सर्पाला) सर्पमित्र राहुल कढरे याने सुमारे दोन तास परिश्रम करून आपल्याकडील कौशल्याने शिताफीने सहजपणे या नागाला पकडले. शहरातील दुसऱ्या ठिकाणाहून एका धामण जातीच्या सर्पाला देखील काही वेळात पकडून या दोन्हींना वनक्षेत्रातील जंगलात सोडून दिले.

दुपारी दोन वाजेच्या सुमारास भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जमाती आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांचे कुबेर पार्क येथील राहत्या घराच्या मागील बाजूस सर्प आढळला त्याबाबत सर्पमित्र राहुल कढरे यास कळविण्यात आले. माहिती मिळताच सर्पमित्र राहुल आपले सहकारी जगदीश गावित, वसीम मकरानी यांच्यासोबत दाखल झाले या सर्पाला पकडण्यासाठी त्याचा भर उन्हात शोध घेत सुमारे तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर भारतीय कोब्रा जातीच्या विषारी नाग असल्याचे समजले त्याला आपल्याकडील कौशल्याने पकडले . त्यानंतर त्याला एका काचेच्या बाटलीत बंद करून अक्कलकुवा वनक्षेत्राच्या दप्तरी नोंद करून वनक्षेत्रातील नर्सरीमध्ये सोडून देण्यात आले.

शुभम भन्साली, एम.डी.टी.व्ही.अक्कलकुवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here