सिन्नर/नाशिक : २१/३/२३
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे नवीन वर्ष अर्थात गुढीपाडवा…
सिन्नर शहराला लाभली आहे परंपरा गुढीपाडव्याची.. ती पण ऐतिहासिक परंपरा..
गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवीन वास्तूमध्ये प्रवेश, व्यवसाय प्रारंभ ,तसेच नव उपक्रमांचा प्रारंभ, तसेच सोने खरेदी याला महत्व दिलं जात असतं..
दारी उभी केलेली गुढी म्हणजे विजयाचं आणि समृद्धीचे प्रतीक मानलं जातं..
अशीच ऐतिहासिक परंपरा लाभलेलं नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहर..
सिन्नर शहरातून दरवर्षी शोभायात्रा काढण्यात येते..
या शोभायात्रेच्या माध्यमातून वीरांची मिरवणूक काढली जाते..
तर भैरवनाथ महाराजांच्या पटांगणात गोफचं सादरीकरण केलं जातं..
ऐकू या सिन्नरचा हा इतिहास नेमका काय श्री लहामगे यांच्याकडून..
तर कंगन विकणाऱ्या व्यवसायिकांनी आपली दुकान थाटली होती.. कोरोनाच्या काळात व्यवसायिकांचा व्यवसाय ठप्प झाला होता..
परंतु आता तब्बल दोन ते अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा कंगन व्यवसाय तेजीत आल्याच सिन्नरकरांनी म्हटलंय..
ऐकूया कंगन विकणाऱ्या या महिला विक्रेत्या नेमकं काय म्हणाल्यात
नववर्षाचे या निमित्ताने स्वागत केलं जातं…
महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा गुढीपाडव्याचा जल्लोष पाहावयास मिळेल हे तेवढेच खरं..
यापूर्वी देखील दहीहंडी उत्सव, शिवजयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरे केले गेले
आता गुढीपाडव्याच्या निमित्ताने मराठी नववर्षाचे स्वागत तेवढ्या दिमाखात होणार हे तेवढेच खरं…
आमच्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या एम.डी .टी.व्ही कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा…
सिन्नरहून या बातमीसाठी तेजस पुराणिक ,जिल्हा प्रतिनिधी ,एम.डी. टी.व्ही न्यूज नाशिक