नंदुरबार -५/४/२३
नंदुरबार जिल्ह्य़ात या ना त्या आजाराने अंथरुणावर महिनोंमहिने खिळून असलेल्या पोलीस अंमलदारांच्या घरी दरमहा न चुकता किराणा व जीवनोपयोगी वस्तू पाठविल्या जातात. आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेण्याची नंदुरबार पोलीसांची दिलदार वृत्ती सध्या राज्यात चर्चेचा विषय बनला आहे.
कधीकाळी खात्यासाठी जीवाची बाजी लावणारे पोलीस अंमलदार जेव्हा ताणतणावाची नोकरी, अनियमित जेवण व अतिरिक्त काम यामुळे गंभीर आजारी पडतात
व अंथरुणावर खिळून रहातात
अशा वेळेस त्यांना व कुटुंबियाना एकटे पडू दिले जात नाही.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
नंदुरबारचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षी उदयास आलेली ही योजना नंदुरबारच्या सर्वच पोलीसांचे मनोबल वाढविणारी ठरली आहे.
मात्र या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे सहकारी पोलीस अधिकारी यांचे यात खरे योगदान असल्याने त्यांना याचे श्रेय ते देतात.
“तुम्ही कामात कमी पडू नका, तुमच्या वेलफेअरमध्ये मी कमी पडणार नाही” असा संदेश देणा-या आपल्या कॅप्टन बद्दल म्हणजेच एस.पीं.बद्दल नंदुरबार पोलीसांत यामुळेच प्रचंड आदर पहायला मिळतो.
खाकी वर्दीतील हे आहेत नंदुरबार जिल्हा पोलीस प्रमुख पी आर पाटील जे सर्वसामान्यांचे देवमाणूस ठरलेत तर गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून ओळखले जातात ..
नंदुरबारचे एस पी म्हणून सूत्रे हाती घेतली आणि त्यांनी आपला दबदबा निर्माण केलाय ..
केवळ गुन्हेगार आणि गुन्हा करू पाहणाऱ्यांना पाटील साहेब यांचा धाक तर बसलाच पण सर्वसामान्य नागरिक ,पोलीस कुटुंबीय यांना त्यांच्या प्रेमळ स्वभावाची आणि मायेची ऊब मिळाली ..
हे दोन स्वभाव असलेलं हे व्यक्तिमत्व काही दिवसात जनमाणसात अधिक लोकप्रिय झालं आणि आपलंस देखील .. या माणसाला आणि त्यांच्या माणुसकीला आमचा विनम्रतापूर्वक सलाम !
प्रवीण चव्हाण ,जिल्हा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज,नंदुरबार