नंदुरबार -२३/७/२३
शाळेला क्रीडा विभाग योजनेचे महत्व पटवून द्या, जास्तीत जास्त शाळा व खेळाडू क्रीडा स्पर्धेत कसे सहभाहगी होतील या करीता तालुका क्रीडा संयोजक व क्रीडा मार्गदर्शक तसेच क्रीडा संघटना यांनी प्रयत्न करावेत तसेच तालुका व जिल्हा क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगदान द्या असे आवाहन क्रीडा उपसंचालक तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी या वेळी केले
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
नंदुरबार जिल्हा क्रीडा कार्यालयात नंदुरबार जिल्हा क्रीडा शिक्षक व क्रीडा मार्गदर्शक तसेच क्रीडा संघटना यांच्या सदस्यांची सह विचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यात सन ,2023 वर्षात विविध जिल्हा. विभाग .राज्य खेळांच्या स्पर्धा आयोजन बाबत स्थळ व तारीख नियोजन बाबत निश्चिती करण्यात आली.
या वेळी जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार पुरस्कारप्राप्त बळवंत निकुंभ .राजेंद्र साळुंखे. जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष सुनील सूर्यवंशी . युवा क्रीडा शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष मयुर ठाकरे. नंदुरबार क्रीडा संयोजक मीनल वळवी,शहादा तालुका संयोजक भालचंद्र चौधरी. अक्कलकुवा तालुका संयोजक धनराज मराठे.मुकेश बारी. महेंद्र काटे यावेळी उपस्थित होते.
दरम्यान येणाऱ्या काळात होणाऱ्या क्रीडा स्पर्धा पूर्वी ऑन लाईन खेळाडू नोंदणी कशी करावी याबाबत प्रत्येक तालुक्यात सभा घेवून क्रीडा विभागाचा विविध योजना तसेच नोंदणी कशी करावी या बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे
महेंद्र सूर्यवंशी ,तळोदा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ..