नंदुरबार : दि.१०/०२/२०२३
निमित्त होतं सेंट मदर टेरेसा स्कूलच्या सांस्कृतिक संमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभाचं..
दोन वर्ष कोरोनात गेली.. मुलांना अनुभवता नव्हती आली सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेण्याची संधी.. आता ती संधी चालून आली या निमित्ताने सेंड मदर टेरेसा स्कूल मधील विद्यार्थ्यांना आपला सांस्कृतिक अविष्कार दाखवण्याची.. विविध नृत्य सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवल्याचं पहावयास मिळालं. पाहूया विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक अविष्कार..
तर यावेळी जिजामाता शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर अभिजीत मोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यावेळी पालकांसह विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
व्यासपीठावर जिजामाता शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष शोभाताई दिलीप मोरे यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर विक्रांत मोरे सदस्य राऊ दिलीप मोरे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रवींद्र पाटील, माध्यमिक शिक्षिका मीनाक्षी पाटील, शाळेच्या प्राचार्या जयश्री ॲलेक्स, स्कूल लीडर आवेश खान, शाळेचे हेड बॉय नीरज पटेल, शाळेची हेड गर्ल फरीना काझी उपस्थित होते.
शाळेत झालेल्या या बहारदार कार्यक्रमानं उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी आणि उपस्थित पालकांनी देखील या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे दाद दिली.
नंदुरबारहुन प्रवीण चव्हाण नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज..