नंदुरबारात राज्यस्तरीय समता रत्न पुरस्कारांचे वितरण

0
261

युवकांनी बाबासाहेबांच्या आदर्शातून सामान्यांची सेवा करावी : पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

नंदुरबार :- युवकांनी बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामान्य जनतेची सेवा करावी, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा आदिवासी विकासमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित यांनी केले. नंदुरबार येथील समता युवा मंच तथा विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती कोरिट नाका परिसर नंदुरबार वतीने महात्मा ज्योतिबा फुले व विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त “मानवंदना महामानवास” या संगीतमय महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन व विश्ववंदनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेचे पूजन ना.डॉ. गावित यांच्यासह संसदरत्न खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सुप्रियाताई गावित यांच्या हस्ते करण्यात आले.

a8c898be 964c 4d5c b0e6 8d3ed77b14b0

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

यावेळी कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय, साहित्य, पत्रकारिता, शैक्षणिक चळवळ या माध्यमातून समता प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या विशेष योगदानासाठी राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका डॉ. नूतनवर्षा राजेश वळवी, राजकारणातून समाजकार्य करत उपेक्षित वंचित घटकांना न्याय देण्यासाठी झटणाऱ्या भरत माणिकराव गावित, सामाजिक हित जोपासत कार्य करणारे डॉ. यशपाल जावरे, आदर्श निपक्षपाती पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात आपला ठसा उमटविणारे बाबासाहेब राजपूत, सहकारी संस्थेच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे युवा उद्योजक प्रवीण शिरसाठ, अनेक वर्षांपासून क्रीडा क्षेत्रातून असंख्य खेळाडू घडविणारे प्रा.डॉ. दिनेश बैसाणे यांना “समता रत्न” या पुरस्काराने

2b0eb62d 0d62 45ba 96fb aa69a86ccfae

तसेच अल्पशा काळात जिल्हा परिषद प्रशासन अत्यंत जबाबदार व प्रभावीपणे हाताळणाऱ्या जिल्हा परिषद आपल्या दारी या अभिनव उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या दारापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविणाऱ्या जिल्हा परिषदेतील २०१२ सालापासून प्रलंबित विविध पद भरतीसाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रही प्रभावी भूमिका मांडणाऱ्या, जिल्ह्यातील साठ शाळांना कायमस्वरूपी मुख्याध्यापक देऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना न्याय दिल्याबद्दल युवा नेतृत्व व नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांना राज्यस्तरीय “समता भूषण” पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्हा पालकमंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित, खा.डॉ. हिना गावित यांच्याहस्ते देऊन गौरविण्यात आले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

यावेळी सुलभा महिरे , मनीष बिरारी, मंगेश वाघमारे, जितेंद्र खवळे, प्रांजल बैसाणे आदींचा स्तुत्य निवडी संदर्भात सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास नंदुरबार आरपीआय जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, नवापूर नगराध्यक्ष नंदू गावित नवापूर, जि. प. सदस्य मोहन दादा शेवाळे, एस ए एम मिशन हायस्कूलचे संचालक राजेश वळवी, नगरसेवक नरेंद्र नगराळे, चंद्रकांत नगराळे, जितूभाऊ जमदाडे, नानाभाऊ निकम, अनिल कुवर, भीम आर्मी जिल्हाध्यक्ष संजू रगडे, पत्रकार जीवन पाटील, भूषण रामराजे, गौतम बैसाणे आदी उपस्थित होते.

2c1c3c4a cb98 4178 aacb df7790146c0b

कार्यक्रमाचे आयोजन राम साळुंके सुभाष पानपाटील, सचिन पिंपळे, भैय्या बाविस्कर, जितेंद्र पानपाटील, प्रशांत पाटील एड. प्रेमानंद इंद्रजीत राहुल रामराजे सिद्धार्थ साळुंखे, गणेश शिरसाठ, गौतम पानपाटील, श्याम साळुंके, सुलतान पिंजारी, संतोष शिरसाट, अजित कुलकर्णी, दीपक बंडीवार, किरण खोकले आदींनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षबोध बैसाणे यांनी केले.

जीवन पाटील. कार्यकारी संपादक, एम.डी.टी.व्ही. न्युज नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here