BIG BREAKING: राष्ट्रवादी अध्यक्षपद : बैठकीतून महत्त्वाची बातमी एम डी टी व्हीच्या सूत्रांच्या हाती..

मुंबई -३/५/२३

राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे.

ADVERTISEMENT

शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण असणार यावर चर्चा सुरू असतानाच आता पक्षाच्या वतीनं मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

वरिष्ठ सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची निवड लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

SPONSORED CONTENT

तुर्तास तरी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार नसल्याची माहिती समोर येत आहे.

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0

सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय अध्यक्षाचं पद रिक्त ठेवून कार्याध्यक्षाचं पद निर्माण केलं जाणार आहे.

याबाबत पक्षातील वरिष्ठ नेते आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे.

पवार कुटुंबातीलच व्यक्ती कार्याध्यक्ष म्हणून निवडला जावा यावर देखील पक्षातील वरिष्ठ नेते ठाम असल्याची माहिती समोर येत आहे.

कार्याध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे यांच्या नावाला सर्वाधिक पसंती असल्याची माहितीये.

याबाबत पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी शरद पवारांसोबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष कोण? ‘ही’ चार नाव आघाडीवर; समितीच्या बैठकीत होणार निर्णय –
दरम्यान दुसरीकडे राज्याची धुरा अजित पवार यांच्या हाती सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये प्राथमिक पातळीवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

तर दुसरीकडे वरीष्ठ नेत्यांची राष्ट्रीय पातळीवरील कोअर कमिटी करुन त्यात अजित पवारांसह अनेक वरीष्ठ नेत्यांचा समावेश करण्यावर ही प्राथमिक चर्चा झाली आहे.

एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,मुंबई

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here