राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा..

0
137

नंदुरबार -८/४/२३

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना संलग्न नंदुरबार जिल्हा व शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या सदस्यांनी राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी बैठकीत विविध विषयांवर चर्चा व मंथन करण्यात आले.
शासकीय विश्रामगृह येथील सभागृहात आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष वर्धा निवासी सुनील पाटणकर होते.

तर प्रमुख अतिथी म्हणून राज्य सचिव सांगलीचे विकास सूर्यवंशी, बुलढाण्याचे कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार, उपाध्यक्ष रवींद्र कुलकर्णी मालेगाव, कार्यकारणी सदस्य गोपाळ चौधरी जळगाव, उपस्थित होते.

याप्रसंगी सुनील पाटणकर म्हणाले की, संघटनात्मक धोरण ठेवून संघटनेची नोंदणी करावी, राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना अंमलात आणण्यासाठी वर्तमानपत्र विक्रेत्यांनी संघटित होणे गरजेचे आहे.

स्थानिक पातळीवर नियमित बैठका घ्याव्यात.

आता WhatsApp वरमिळवाब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्णमाहिती ! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

धर्मदाय किंवा कामगार विभागाकडे जाऊन संघटनेची रीतसर नोंदणी करावी असे सांगितले.

राज्य पदाधिकार्यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध समस्या, अडचणींवर चर्चा करून मार्गदर्शन केले.
याप्रसंगी राज्य कार्यकारणी सदस्य उमेशचंद्र वाणी यांनी प्रास्ताविक करून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अडचणी मांडल्या.
या बैठकीस नंदुरबार जिल्हा व शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे ज्येष्ठ सदस्य लक्ष्मण वाणी, शहराध्यक्ष किशोर देसाई, उपाध्यक्ष नासिर पठाण, सचिव राजेश काशीद, महेश भागवत, दीपक कुलकर्णी आदी उपस्थित होते.

प्रविण चव्हाण एम. डी. टी.व्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी.नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here