मनमाड, नाशिक :१४/०२/२०२३
करंजवण योजनेसाठी मनमाड नगरपालिकेने भरावयाचा 15% स्वनिधी देखील राज्य सरकार देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच मनमाड येथे केली.
मनमाड शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आश्वासक असलेल्या बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणी योजनेचा भूमिपूजन सोहळा सोमवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
व्यासपीठावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री खासदार डॉक्टर भारती पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे,अंजुम कांदे उपस्थित होते.
मनमाड शहरात एमआयडीसीला मान्यता व नगरपालिका इमारतीच्या नूतनीकरणासाठी दहा कोटींचा निधी तातडीने मंजूर केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात थांबलेली सर्व कामे आम्ही सुरू केली आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सरकार सर्वसामान्यांसाठी असून सात-आठ महिन्यात कोट्यावधी रुपयांच्या कामे सुरुवात केली आहे.
तसंच मनमाड साठी ड्रामा केअर सेंटरला मंजुरी देत असल्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं.
विविध विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. या कार्यक्रमाचे आयोजन मनमाड नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी केलं होतं. मोठ्या संख्येने बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक उपस्थित होते.
तेजस पुराणिक, जिल्हा प्रतिनिधी एमडी टीव्ही न्यूज नाशिक