इंदू मिलमध्ये असा असणार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, पहिली झलक PHOTOS

मुंबई -७/४/२३

इंदू मिल इथं नियोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सुधारित संकल्पनेस  जानेवारी 2020 मध्ये राज्य सरकारने मान्यता दिली.  स्मारकातील पुतळयाची उंची वाढवून 350 फूट करण्यात आली.

ADVERTISEMENT
18 1
1
19
2
20 1
3
21
4
22
5

मुंबई येथील इंदू मिलमध्ये उभारण्यात येत असलेल्या स्मारकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मॉडेलला आज राज्य सरकारच्या वतीने स्मारकाच्या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या सर्व पक्षीय समितीने मान्यता दिली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी  राज्य सरकारच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या समितीची आढावा बैठक गाझियाबाद(उत्तर प्रदेश) येथील राम सुतार आर्ट कंपनी  इथं आज आयोजित करण्यात आली होती.

SPONSORED CONTENT

या बैठकीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या  ३५० फुटाच्या पुतळ्याचे  मॉडेल जे २५ फुटी आहे त्याची पाहणी करून सर्वांनुमते मंजुरी देण्यात आली. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात बाबासाहेबांचा ३५० फुट उंच पुतळा उभारण्यात येणार आहे.

जगविख्यात शिल्पकार पद्मभूषण राम सुतार हे हा पुतळा उभारणार असून गाझियाबाद इथं या पुतळ्याची २५ फुटाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

या प्रतिकृतीच्या आधारावरच मूळ पुतळा उभारण्यात येत असल्याने समितीने आज या प्रतीकृतीची पाहणी केली.

बदलाअंती उपसमितीच्या मंजुरीनंतर मूळ पुतळा निर्माण कार्यास सुरुवात होणार आहे.

आगामी अडीच वर्षात पुतळ्याचे काम पूर्ण होणार आहे. यासाठी सर्व तयारी राज्य सरकारच्या विने करण्यात येणार आहे. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी राज्यशासनाने ११०० कोटींच्या सुधारीत निधीस मंजुरी दिली आहे.

राज्यशासनाने मार्च २०२२ अखेर २२८ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. वर्ष २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात स्मारकासाठी २०० कोटींची तरतूद करण्यात आली असून यातील यापैकी २८ कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

इंदू मिल इथं नियोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सुधारित संकल्पनेस  जानेवारी २०२० मध्ये राज्य सरकारने मान्यता दिली. 

यानुसार स्मारकातील पुतळयाची उंची वाढवून ३५० फूट करण्यात आली. 

पुतळा उभारण्यासाठी चौथरा निर्माणाचे कार्य सुरी असून याचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

गाझियाबाद येथील राम सुतार कंपनीत पुतळयाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. यात आजच्या आढावा  बैठकीत काही बदल सुचविण्यात आले आहेत.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून वर्ष २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात या स्मारकासाठी ३०० कोटींची आर्थिक तरतूद करण्यात करण्यात आली आहे आता सामाजिक न्याय विभागाच्या वतीने हा संपूर्ण पुतळा उभारण्यात येणार आहे. 

यावेळी पाहणीनंतर राम सुतार आणि त्यांचे पुत्र अनिल सुतार यांना प्रतीकृतीतील आवश्यक रेखीव बाबींविषयी काही बदल करण्याच्या सूचना दिल्या.

या सूचनांनुसार एमएमआरडीए, जे.जे स्कुल ऑफ आर्ट, आय.आय.टी. बॉम्बेची तज्ज्ञ मंडळी आणि स्मारक सल्लागारांच्या मार्गदर्शनाधारे बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीत आवश्यक बदल करून मूळ पुतळ्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. 

या समितीत माजी मंत्री संजय बनसोडे, आ. यामिनी जाधव, माजी मंत्री सुलेखा कुंभारे,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, डॉ राजेंद्र गवई, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे, सहसचिव दिनेश डिंगळे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंते प्रकाश भांगरे आदी सह विविध प्रमुख सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

ब्युरो रिपोर्ट ,एम डी टी व्ही न्यूज मुंबई

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here