नंदुरबार : २३/३/२३
दिनांक 26 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11.00 वा. सुमारास यज्ञेश महेश सोनी (38 )धंदा- सोनार डाय कटींग काम, रा. प्लॉट नंबर 17-2ब, वृंदावन कॉलनी, नंदुरबार यांचे नंदुरबार शहरातील शहीद शिरीष मेहता रोड, असोदेकर वाडा, जनक आभुषणच्या मागे असलेले श्रीजी दिपज्योती डाय कटर्स दुकानात त्यांचे वडील महेश् कांतीलाल सोनी हे दुकानात एकटेच असतांना त्यांना बोलण्यात गुंतवून अनोळखी चार इसमांनी 3,50,000/- रुपये किमतीची 5 ते 6 किलो वजनाची सोनेमिश्रीत माती चोरुन नेली
म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 174/2023 भा.दं.वि. कलम 379,34 प्रमाणे 04 आरोपीतांविरुध्द् दाखल आहे.
दिनांक 21 मार्च 2023 रोजी नंदुरबार पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, श्रीजी दिपज्योती डाय कटर्स या दुकानातून सोनेमिश्रीत माती चोरुन नेणारे संशयीत इसम हे मारुती सुझुकी इर्टीगा वाहन क्रमांक GJ-03 LG-0907 हिचेने धुळे कडून नंदुरबार मार्गे गुजरात राज्यातील राजकोट येथे जाणार आहे अशी बातमी मिळाली.
सदरची माहिती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस किरणकुमार खेडकर यांना सांगितली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी तात्काळ एक पथक तयार करुन पथकातील अंमलदारांना सदरची माहिती सांगून संशयीतांना ताब्यात घेवून विचारपुस करुन कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबार शहरातील धुळे चौफुली येथे बॅरीकेटींग लावून वाहनांची तपासणी करीत असतांना दिनांक 22/ मार्च 2023 रोजी 8 :00 वाजताचे सुमारास एक पांढऱ्या रंगाची इर्टीगा क्रमांक GJ-03 LG-0907 धुळेकडून येवून नाकाबंदीच्या ठिकाणी थांबली.
वाहनातील इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता गाडी चालविणाऱ्या इसमाने त्याचे नाव विजय करसनभाई गोहील (40) रा. चुनारवाड, माजेवाडी दरवाजा, जुनागड पुढील सीटवर त्याचे बाजूला बसलेल्या इसमाने त्याचे नाव प्रविण भिकुभाई दोडीया (39) रा. चुनारवाड, स्ट्रीट नंबर-2, आजी नदीच्या काठी, मफातीयापरा, भावनगर रोड, राजकोट ह.मु सापर, शांतीधाम सोसायटी, गोंडल चौफुली जवळ, राजकोट
तर मागील सीटवर बसलेल्या इसमांनी त्यांचे नाव विजयभाई जीवनभाई सोलंकी (37) रा. चुनारवाड-1, नदीका काँटा विस्तार, लखाजीराज, उद्योग नगर, भावनगर रोड, राजकोट,जयदीप धिरुभाई चौहान (28 ) रा. गल्ली नंबर-5 वेलनाथ सोसायटी, कोठारीया रोड, राजकोट असे सांगितले.
ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीतांना विचारपूस केली असता ते उडवा-उडवीची उत्तरे देवू लागल्याने वाहनाची तपासणी केली
गाडीच्या मागच्या सीटवर एक काळ्या रंगाची पिशवी आढळून आली.
पिशवी उघडून पाहणी केली असता त्यात काळसर माती सोने, चांदीचे कण मिश्रीत आढळून आली, म्हणून 4,00,000 रुपये किमतीची 8.388 किलो ग्रॅम वजनाची सोने, चांदीचे कणमिश्रीत माती, 31 हजार रुपये किमतीचे 4 मोबाईल, 8200/- रुपये रोख,6,00,000/- रुपये किमतीची एक पांढऱ्या रंगाची मारुती इर्टीगा गाडी नंबर GJ-03 LG-0907 व इतर मुद्देमाल असा एकुण 10 लाख 39 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर कारवाई करुन जप्त करण्यात आला
ताब्यात घेण्यात आलेले संशयीत आरोपी व जप्त मुद्देमाल गुन्ह्याच्या पुढील तपासकामी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे..
ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीत आरोपीतांनी महाराष्ट्रात व इतर कोणत्या राज्यात अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत का ? याबाबत सखोल तपास करण्यात येत आहे असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस नाईक राकेश मोरे, तुषार पाटील, मोहन ढमढेरे, पोलीस अंमलदार किरण मोरे, राजेंद्र काटके, अभय राजपूत, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली आहे.
प्रविण चव्हाण एम. डी. टी.व्ही न्यूज ,जिल्हा प्रतिनिधी, नंदुरबार.