०२ लाख ८० हजाराच्या ०६ दुचाकी शिरपूर पोलिसांनी केल्या जप्त ..
शिरपूर /धुळे -२३/५/२३
शिरपूर शहर पोलीस ठाण्यातील डी.बी शोध पथकाच्या पोलिसांनी मोटरसायकल चोरट्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातील चोरीस गेलेल्या ०६ मोटरसायकली हस्तगत करत ताब्यात घेतले आहे.
शहरातील खंडेराव मंदिरा समोर लावलेल्या होंडा कंपनीच्या युनिकॉर्न मोटारसायकल चोरीच्या तपासावरून शहरातील क्रांतिनगर मधील राहणाऱ्या दोन चोरट्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ०२ लाख ८० हजार रुपये किमतीच्या ०६ मोटारसायकल विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या हस्तगत केल्या
त्यांच्यावर कारवाई करण्यात आली
अशी माहिती शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांनी दिली.
संशयित (संतोष विठ्ठल हटकर वय वर्ष ३३ रा. क्रांतिनगर शिरपूर जि. धुळे व रितेश सुरेशसिंग जमादार वय वर्ष ३७ रा. सातपूर, नाशिक हल्ली मु. क्रांतिनगर शिरपूर जि. धुळे) यांना अटक कारण्यात आली आहे.
शिरपूर येथील खंडेराव मंदिरा समोरून दि.२० मे सोमवार रोजी सायंकाळी एमएच १८ बीएस १९३० क्र. असलेली होंडा कंपनी ची सीबी युनिकॉर्न दुचाकी अज्ञातांनी चोरून नेल्याची तक्रार शहरातील आदर्श नगर मध्ये राहणाऱ्या अनिल भोई यांनी केली होती.
सदर गुन्ह्यांचा तपास पोलिसांकडून केला जात असतांना क्रांतीनगर मध्ये चोरी झालेली दुचाकी सीबी युनिकॉर्न वरून संशयीतरित्या फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांना मिळाली.
मिळालेल्या माहितीवरून संशयितांना दुचाकी सह ताब्यात घेतले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
त्यांना अधिक विचारपूस केली असता त्यांनी विविध ठिकाणाहून ५ मोटारसायकल चोरी केल्याची कबुली देत क्रांतीनगर मधून ते राहत असलेल्या घराजवळून बाकी दुचाकी जप्त करत ०२ लाख ८० हजार रुपयाच्या ०६ दुचाकी जप्त करत त्यांना अटक केली ..
शिरपूर शहर पोलीस ठाण्यातील ०१ शिंदखेडा तालुक्यातील ०२ असे तीन गुन्हे शिरपूर शहर डीबी शोध पथकाने उघडकीस आणले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली
प्र.उपविभागीय पोलिस अधिकारी तथा शिरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए. एस. आगरकर, डी. बी. पथकाचे पोहेकॉ ललीत पाटील, लादुराम चौधरी, पोना मनोज पाटील, पोकॉ विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, मुकेश पावरा, प्रशांत पवार, प्रविण गोसावी, मनोज दाभाडे, सचिन वाघ, भटु साळुंके तसेच होमगार्ड मिथुन पवार व राम भिल यांच्या पथकाने हि कामगिरी केली.
एम. डी टीव्ही न्यूज साठी राज जाधव शिरपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी.