नंदुरबार : ७/३/२०२३
सूतगिरणीविरोधात तन्मय जैन यांनी आंदोलन सुरु केलं होतं ..
माहे मार्च-२०२० पासुन कोरोना प्रादुर्भाव मुळे सूत गिरणी ३ ते ४ महिने बंद राहिली.
तसेच सूत गिरणी सुरु झाल्यानंतरही ५० टक्के क्षमतेने सूत गिरणी सुरु झाली.
यामुळे आपल्याकडे असलेल्या साठ्यांची किंमत ३० ते ४० टक्क्याने कमी झाली.
त्यामुळे आम्हांस फार मोठे आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थीतीत आम्ही जास्तीत जास्त कापसाचे पेमेंट देण्याचा प्रयत्न केला आहे.
परंतु अजुन देखील पेमेंट देणे बाकी आहे.
याकरीता आम्ही सूत गिरणीस आर्थिक सहाय्य प्राप्त करण्याकरीता वित्तीय संस्थांशी संपर्क करीत आहोत.
त्यानुसार त्यांनी सूत गिरणीला भेट देऊन कागद पत्र तपासलेले आहेत.
लवकरच त्यांच्याकडुन प्रतिसाद मिळेल असे वाटते.
आपल्या सूत गिरणीने मागिल ३५ वर्षापासुन शेतकरी सभासदांना नियमीतपणे पेमेंट अदा केलेले आहे.
परंतु कोरोना कालावधी मुळे अडचण आल्याने पेमेंट करणेस उशिर होत आहे.
वरील प्रमाणे निधी उपलब्ध झाल्यास आंम्ही शेतकरी सभासदाचें पेमेंट कमीत कमी तीन व जास्तीत जास्त सहा महिन्याच्या आंत करणार आहोत.
हे हि पहा : https://bit.ly/3IUM59V
आपणांस उशिरा पेमेंट होत असल्याबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करीत आहोत अशा आशयाचं पत्र नुकतंच संचालक मंडळान तन्मय जैन यांना सुपूर्त केलं
त्यानंतर त्यांनी आंदोलन स्थगित केलं ..
तहसीलदार यांच्या समक्ष लेखी आश्वासन दिल्यानंतर सर्व शेतकऱ्यांसोबत चर्चा करून अन्न व जल त्याग आंदोलन मागे घेतले.
या दरम्यान सकाळी ९ वाजेपासून उन्हात बसलेले असल्याकारणाने तन्मय सुनिल जैन यांची प्रकृती बिघडली होती.
पण जो पर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत अन्नाच्या कणाला सुद्धा हाथ लावणार नाही असे त्यांनी सांगितले.
सर्व शेतकऱ्यांच्या होकार नंतर आंदोलन तूर्तास स्थगित केले.
कमीत कमी ३ व जास्तीत जास्त ६ महिन्याच्या आत पैसे न मिळाल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन तहसीलदार यांनी तन्मय सुनिल जैन व शेतकरी यांना दिल्यानंतर शेतकरी थांबले.
तन्मय जैन यांनी सर्वं पत्रकार, पोलिस प्रशासन व शेतकऱ्यांचे आभार मानले.
प्रविण चव्हाण ,जिल्हा प्रतिनिधी ,एम. डी. टी. व्ही न्यूज नंदुरबार.