नेर,धुळे :१०/३/२०२३
धुळे तालुक्यातील नेर ते कावठी रस्ता खुप खराब असुन त्या रस्त्यालगत नेर,शिरधाने,अकलाड,मोराणे, कावठी येथील शेतकऱ्याची शेती असल्याने शेतात जाण्यासाठी खूप महत्वाचा रस्ता असल्याने तो खूप मोठया प्रमाणात खराब होता.
म्हणून नेर जि.प.गटातील भाजप पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी माजी केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री व धुळ्याचे लोकप्रिय खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे मागणी केली होती.
यानुसार खासदार साहेबांनी पंतप्रधान ग्राम सडक योजनेत शिफारस केली
व या रस्त्यासाठी ७.५ किलो मीटरसाठी ५ कोटी ६२ लाख मंजूर करून महामार्गा सारखा रस्ता होणार आहे व नागरिकांना धुळे जाण्यासाठी कमी अंतराचा सोयीचा रस्ता होणार.
यासाठी माजी जि.प.सदस्या मनिषा शंकरराव खलाणे, माजी सरपंच शंकरराव खलाणे, गुलाबराव बोरसे,संजय कपूर,डॉ सतीष बोढरे,वसंत देशमुख,वंसत सोनवणे, सुरेश सोनवणे,आर.डी.माळी,संतोष ईशी,डॉ दिनेश नेरकर,दिपक मोरे, संजय सैंदाणे,गोटु अमृतसागर,दिनेश सोनवणे,शंकर कोळी,रावसाहेब खलाणे,दिपक खलाणे,उमेश जयस्वाल,सौरभ विभांडीक,तुषार जयस्वाल,पवन कोळी,अर्जून गायकवाड, नितीन भदाणे,भगवान पाटील,खेमराज महाले, रमेश पाटील, सतीष बागुल आदींनी वेळोवेळी मागणी केली होती .
रस्ता मंजूर झाल्याने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी मोदी सरकारचे व खासदारांचे आभार मानले.
MD TV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे