ऊसतोड कामगारांना ओळखपत्र मिळणार

0
294

नंदुरबार : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत “शासन आपल्या दारी” अभियानांतर्गत ऊसतोड कामगारांना ओळखपत्र वाटप करण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी दिली आहे.

राज्यातील ऊसतोड कामगारांचे व पर्यायाने त्यांच्या कुटूंबियांचे जीवन अस्थिर व अत्यंत हलाखीचे असल्यामुळे त्यांचे जीवन सुखकारक करून त्यांचे राहणीमान उंचावून आयुष्य स्थिर व सुरक्षित करण्यासाठी ऊस तोडणी व्यवसायातील ऊसतोड कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ओळखपत्र प्रदान करणेसंदर्भात नियमावली निश्चित केली आहे.

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

SPONSORED CONTENT

त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व ऊसतोड कामगारांना आवाहन करणेत येते की, जे ऊसतोड कामगार मागील ३ वर्षे किंवा जास्त कालावधीपासुन ऊसतोडणीचे काम करत आहेत व जे इतर नियमांची पूर्तता करत आहेत त्यांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क करून नोंदणी करून विहित नमुन्यात ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे. जेणेकरून भविष्यात सदर कामगारांकरीता शासनाच्या येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेणे सोईचे होईल, असे आवाहन श्री. नांदगावकर यांनी केले आहे.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार.

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here