नंदुरबार – येथील जिल्हा रुग्णालयात रुग्णावर उपचार करणार्या अधिपरिचारीकेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रुग्णासह आई व आजी तिघांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्हा रुग्णालयात तबस्सूम शरीफ शहा हे उपचारासाठी दाखल झाले होते. यावेळी या रुग्णावर अधिपरिचारीका पूजा सुनिल कापसे या औषधोपचार करीत होत्या. कर्तव्य बजवित असतांना रुग्ण यांची आई व आजीने अधिपरिचारीकेला मारहाण करीत शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. तसेच जीवेठार मारण्याचीही धमकी दिली.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
याबाबत अधिपरिचारीका पूजा सुनिल कापसे यांनी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शहा, तिची आई व आजी अशा तिघांविरुद्ध भादंवि कलम 353, 323, 504, 506, 34 सह महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकिय संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंधक) अधिनियम 2010 चे कलम 3 चे उल्लंघन 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदा पाटील करीत आहेत.
एम.डी.टी.व्ही. न्युज, नंदुरबार