धुळे -२९/५/२३
धुळे तालुक्यातील नवे भदाने जवळील सुरत-नागपूर महामार्गवर खंडलायकडे येण्या-जाण्यासाठी सर्व्हिस रोड व सुख – सुविधा नसल्याने अपघातस्पॉट बनला आहे.
तसेच संपूर्ण प्रख्यात आदिशक्ती भटाई माता मंदिरकडे महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश असंख्य भाविकजण कायम येत असतात
खंडलाय बु, बांबूर्ले प्र. नेर, खंडलाय खुर्द, शिरधाने, सैताळे, आयने, मळखेडे या गावातील दैनंदिन व्यवहार तालुका, जिल्ह्यात जाणे – येणे हे मुख्यत्व याच महामार्ग नं 06 वरूनच होतं राहते.
तरी या महामार्गावर सर्व्हिसरोड नसल्याने असंख्य अपघात होतं असून आत्ताच एक जीवघेणा अपघात बांबूर्ले प्र नेर येथील शिक्षक धुळ्याहून येतांना खंडलाय कडे जातांना भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीने जोराने धक्का दिला.
त्यांना छातीत जबर मार लागल्यावर तात्काळ धुळे येथे घेऊन गेले.
सुदैवाने त्यांच्यावर जीवितहानी प्रसंग टळला.
तसेच याच रस्त्यावर नियमित असंख्य वाहने येत जात असतात ..
तरी लोकप्रतिनिधी यांनी जीवन मरणाचा प्रश्न समजून अत्यंत पोटतिडकीने महामार्ग क्र 06 अधिकारी, जिल्हाधिकारी, यांना आपापल्या स्तरावर सूचना करून सहकार्य करावे, अशी अपेक्षा खंडलाय गटप्रमुख आबा पगारे, सरपंच, उपसरपंच, सदस्य & ग्रामस्थांतर्फे तसेच पंचक्रोशीतून करण्यात येत आहे.
MD TV न्यूज ,धुळे तालुका प्रतिनिधी,दिलीप साळुंखे