नंदुरबार -२/४/२०२३
पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी गुन्हे बैठकीत चोरीच्या गुन्ह्यांचा गुन्हे आढावा घेतला असता, नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळ्या स्वरूपाचे चोरीचे गुन्हे दाखल असून बरेचसे गुन्हे अद्यापही उघडकीस आलेले नाहीत. त्यामुळे पोलीसांसमोर चोरट्यांना जेरबंद करुन घडलेले गुन्हे उघडकीस आणणे हे मोठे आवाहन होते.
सदर चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन चोरीच्या गुन्ह्यातील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करणे बाबत पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
नवापूर येथील नवीन राष्ट्रीय माहमार्गच्या बाजूला असलेल्या एका शेतातील इलेक्ट्रीक पोल वरून महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीची एकूण – 34,915/- रुपये किंमतीची 1020 मीटर ऍ़ल्युमिनियमची विद्युत तार ही अज्ञात आरोपीतांनी पोलवरून तोडून चोरी केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे राजभूषण भटेसिंग राजपूत – सहाय्यक अभियंता, नवापूर शहर यांनी दि.16 जानेवारी रोजी नवापूर पोलीस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादच्या अनुषंगाने अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता.
नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, ज्ञानेश्वर वारे हे वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार गुप्त बातमीदारांमार्फतीने सदर गुन्ह्याची माहिती घेवून अज्ञात आरोपीचा शोध घेत होते.
दिनांक 02 एप्रिल रोजी नंदुरबार पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली.
नवापूर येथील नवीन राष्ट्रीय माहमार्गच्या बाजूला असलेल्या शेतातून चोरी झालेली ऍ़ल्युमिनियमची विद्युत तार ही नवापूर येथीलच पाटीबेडकी गावाच्या एका शेतात लावली असल्याची माहिती प्राप्त झाली.
सदरची माहिती त्यांनी नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना सांगितली.
पोलीस निरीक्षक वारे हे प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने कारवाईसाठी तात्काळ पथकासह पाटीबेडकी येथे एका शेतात पोहचले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/36S6BFu
त्याठिकाणी त्यांनी बातमीची खात्री केली असता, सदर शेतात त्यांना ऍ़ल्युमिनियमची विद्युत तार पोलवर लावलेली असल्याचे दिसून आले.
सदरवेळी शेतात एक इसम हजर असतांना मिळून आला. त्याने पोलीस आल्याचे पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न केला,
परंतू नवापूरच्या पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीत रायसिंग सोमू गावीत, रा. धोरपाडा, ता. नवापूर, जि.नंदुरबार. त्यास सदर शेतात पोलवर लावलेल्या ऍ़ल्युमिनियमच्या विद्युत तारे बाबत विचारपूस करता तो प्रथम उडवा-उडवीची उत्तरे देवू लागला.
परंतू त्यास विश्वासात घेवून अधिक विचारपुस केली असता त्याने सांगितले की, सदर ऍ़ल्युमिनियमची विद्युत तार ही त्याने नवापूर येथील नवीन राष्ट्रीय माहमार्गच्या बाजूला असलेल्या शेतातून चोरी केल्याचे सांगितले.
सदर शेतात मिळून आलेल्या ऍ़ल्युमिनियमची तार ही कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत करण्यात आली आहे.
सदर ची कामगिरी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, उप विभागीय पोलीस अधीक्षक सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस हवालदार दादाभाऊ वाघ, पोलीस नाईक नितीन नाईक, पोलीस अंमलदार गणेश बच्छे यांच्या पथकाने केली आहे.
प्रविण चव्हाण एम. डी. टी.व्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार