साक्षी हत्याकांडतील आरोपींवर तात्काळ कारवाई करा

0
452

तळोद्यात तहसीलदारांना निवेदन ; टायगर ग्रुप व परिवर्तन युवा मंचची मागणी

तळोदा :- मन सुन्न करणारी घटना दिल्ली येथे साक्षी हत्याकांडने घडवली आहे. हैवान झालेला तिच्या मारेकऱ्याचा सीसीटिव्ही फुटेज पाहून माणुसकी जगातून संपल्यासारखी वाटते. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून कायमस्वरूपी शासनस्तरावरून बंदोबस्त होण्यात यावा, साक्षी हत्याकांडातील आरोपीवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी टायगर ग्रुप व परिवर्तन युवा मंचने केली आहे. याबाबत तळोदा तहसिलदार याना निवेदन दिले आहे.

ADVERTISEMENT

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

निवेदनात म्हटले की, नवी दिल्ली येथील शहाबाद डेरी परिसरात दिनांक २८ मे २०२३ रोजी रात्री १६ वर्षाची मुलगी साक्षी रेड्डी हिचा चाकूने वार करून तसेच दगडाने ठेचुन साहिल खान नावाच्या हैवानकडून निर्गुण हत्या करण्यात आली. साक्षीच्या शरीरावर जवळपास ४० पेक्षा जास्त वेळा चाकूने वार करून भररस्त्यात मारून टाकण्याची घटना गंभीर आहे. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

सदरील आरोपीविरुद्ध खटला चालवून त्याला कठोर शिक्षा देण्यात यावी. तसेच अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा कुठेही होऊ नये, त्याबाबत शासनाकडून कठोर पावले उचलण्यात यावी. शासन स्तरावरून आरोपीस लवकरात लवकर शिक्षा व्हावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी टायगर ग्रुपचे शहराध्यक्ष शुभम खाटीक, परिवर्तन युवा मंचचे नितीन गरुड, सिध्दार्थ नरभवर, आदिवासी युवा शक्ती जिल्हाध्यक्ष विनोद माळी, अविनाश सुरवाडे, संघप्रिय नरभवर,अमोल वळवी, साहिल नरभवर,देवेंद्र शिंदे, रितेश नरभवर, ऋषि पाडवी, धीरज पाडवी आदी उपस्थित होते.

नितीन गरुड. एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, तळोदा ग्रामीण.

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here