तळोदा : नेमसुशिल स्कूलमध्ये प्रवेशोत्सव

0
326

तळोदा येथील नेमसुशिल इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये प्रवेशोत्सव करण्यात आला. शाळेतील काही कर्मचाऱ्यांनी डोरेमॉन, स्पायडरमॅन व सिंड्रेला यांचे मुखवटे वापरून विद्यार्थ्यांशी गुजगोष्टी केल्याने चिमुकले भारावून गेले.

विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुष्प देऊन मुलांचे प्रवेशोत्सव निमित्त स्वागत करण्यात आले. प्रसंगी स्वागत नृत्यच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या क्वालिटी असाव्यात त्या पोस्टरच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आल्या. शैक्षणिक साहित्याचे महत्व सांगण्यात आले. विद्यार्थी व पालकांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून आला. सदर प्रवेशोत्सव सोहळ्याचे संस्थेचे अध्यक्ष निखिलकुमार तुरखिया, संचालिका सोनाभाभी तुरखिया, उपाध्यक्ष दगेसिंग महाले, सचिव संजय पटेल, समन्वयक हर्षल तुरखिया, मुख्याध्यापक पी.डी.शिंपी, उपमुख्याध्यापिका कल्याणी वडाळकर यांनी कौतुक केले.

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

SPONSORED CONTENT

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यामंदिरातील शिक्षिका प्रतिभा बैसाणे, दिपाली पाटील, मनीषा पटेल, योगिता शिंदे, संगीता पटेल, माधुरी पटेल, सुमित्रा तांबोळी, श्रीमती निकम, माधुरी वाघ, गीतांजली पटेल, ज्योती पाडवी, दिपाली पाटील, श्री.बादल, ईश्वर चित्रकथे, गणेश पाडवी, ललिता पाडवी, श्रीमती नंदिनी, श्रीमती दीपा आदींनी परिश्रम घेतले.

महेंद्र सूर्यवंशी. एमडी.टीव्ही. न्युज तळोदा.

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here