या मेन रस्त्याचा कोंडलेला श्वास कधी होणार मोकळा?

0
697

तळोदा -३०/५/२३

तळोदा शहर यां ना त्या कारणाने कायम चर्चेचा विषय असतात
विविध समस्यांनी सध्या तळोदा शहर ग्रासले आहे
त्यात भर पडली मेन रोडवरील रस्त्यांची..
मेन रोडवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त होते तेव्हा प्रसारमाध्यमांनी या रस्त्याविषयी बातम्या प्रसिद्ध केल्या
त्याची दखल घेत खासदार हिना गावित यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला
मुख्य रस्त्याला मंजुरी मिळाली

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
पावसामुळे दुकानात शिरणारे पाणी कायमस्वरूपी बंद व्हावे म्हणून रस्ता खोदून बांधण्यात यावा अशी मागणी व्यापारी असोसिएशन ने केलेली होती
त्यानुसार रस्ता खोदून नवीन पाईपलाईन बसून मेन रोडवरील रस्ता चकाचक करण्यात आला
परंतु आधीचा रस्ता होता तेवढा रस्ता आता वाहतुकीसाठी मोकळा होताना दिसत नाही
त्यामुळे रस्ता सध्या वाहतुकीसाठी अडचणीचा डोंगर ठरत आहे
दोन मोठे वाहने कशी मार्गस्थ करायची असा प्रश्न निर्माण होतो
लहान मोठे अतिक्रमण धारक व्यवसायिकांनी दुकाने थाटली
त्यामुळे अतिक्रमणधारकांचा विळखा वेगळा त्यात वाहनधारकात वादाला ठिणगी पडते ती निराळी
वाढते अतिक्रमण मेन रस्त्यासाठी डोकेदुखी ठरते
नुकतंच समोरासमोर लाल परी आल्या, वाद झाला
परिणामी काही काळ मेन रोडवरील वाहतूक खोळंबली
रस्त्यावरून तळोदा शहरातून बस येजा करणे तारेवरची कसरत वाहन चालकांना करावी लागते
त्वरित मुख्य रहदारीचा प्रश्न सुटावा आणि नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तरित्या पुढाकार घेऊन ही समस्या निकाली काढावी ही तळोदा शहरवासीयांची मागणी आहे
नितीन गरुड ,तळोदा तालुका प्रतिनिधी, एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here