तळोदा :- वेळ रात्री आठ ते साडेआठची… दिवसभराची दगदग नंतर व्यापारी नियोजित वेळेत आपले दुकान बंद करतो… दिवसभरातून मालाची झालेली विक्रीच्या पैशांची बॅग दुकानाबाहेरील ओट्यावर ठेऊन समोरच असलेल्या लॉरीवर सोडा घेतो… मात्र, या वेळेत सदर बॅग एकव्यक्ती अनावधानाने उचलून मार्गस्थ होतो…. बॅग गेल्याचे कळताच व्यापारी हतबल होतो व व्यापारी संघटनेचे तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आपबिती सांगतो. शिवसेनेचे पदाधिकारी क्षणात व्यापाऱ्याकडे येत धीर देतात आणि आपल्या संपर्कातून प्रयत्न करून व्यापाऱ्याला बॅग मिळवून देतात. शिवसेनेच्या या पदाधिकाऱ्यांचे सामाजिक कार्याचे शहरातून कौतुक करण्यात येत आहे.
हे सुध्दा वाचा
“बिपरजाॅय”… नंदुरबारला धोका नाही …! – MDTV NEWS
फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS
मंत्रिमंडळ निर्णय : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १५०० कोटी रुपयांस मंजुरी – MDTV NEW
तळोदा शहरातील हनुमान मंदिरसमोर भटू कासार यांचे दुकान आहे. रात्रीच्या वेळी दुकान बंद करून पैश्याची पिशवी ही बाजुच्या ओट्यावर ठेऊन श्री कासार हे जवळच उभी असलेल्या सोड्याच्या लॉरीवर गप्पा करत होते. तेव्हा त्याचा लक्षातून निघुन गेले की पैश्याची पिशवी आपण बाजूच्या ओट्यावर ठेवली आहे. काही वेळानंतर एका अनोळखी व्यक्तीने पैश्याची पिशवी निघून गेला.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
त्या घटनेची माहिती त्या दुकानदाराने शिवसेना शहर प्रमुख जितेंद्र दुबे व व्यापारी महासंघ अध्यक्ष आनंद सोनार यांना दूरध्वनी वरून कळवली. आनंद सोनर व श्री दुबे यांनी घटनास्थळी धाव घेत परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले. रात्रीची वेळ असल्याने त्यात अस्पष्ट दिसून येत होते. सीसीटीव्ही कॅमेरामधील व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून पिशवी परत करण्याबाबत आवाहन करण्यात आले. दरम्यान, सीसीटीव्हीतील अस्पष्ट चित्रानुसार सदर व्यक्ती कोण यांचा अंदाज लावण्यात आला.
हे सुध्दा वाचा
“बिपरजाॅय”… नंदुरबारला धोका नाही …! – MDTV NEWS
फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS
मंत्रिमंडळ निर्णय : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १५०० कोटी रुपयांस मंजुरी – MDTV NEW
आनंद सोनार, जितेंद्र दुबे, सुरज माळी, कल्पेश माळी, विजय मराठे हे त्या व्यक्तीच्या घरी गेले व आदराने आपण नजरचुकीने पिशवी उचलली आहे का? अशी विचारणा केली. सदर व्यक्तीने क्षणाचा विलंब न करता नजरचुकीने पिशवी घेतली गेल्याचे सांगितले. त्या व्यक्तीने पूर्ण रक्कम असलेली पिशवी परत केली. या पिशवीत ४५ हजार ६७० रुपयांची रोकड होती. व्यापारी भटू कासार यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. काही महिन्या अगोदर देखील नंदुरबार येथील व्यापाऱ्याची रस्त्यावर सापडलीती पैशाने भरलेली बॅग शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर व्यक्तीला परत केली होती. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या सामाजिक कामाचे शहरातून कौतुक करण्यात येत आहे.
महेंद्र सूर्यवंशी. एमडी.टीव्ही. न्युज, तळोदा.