नंदुरबार -२/४/२०२३
नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा हे गाव ओळखलं जातं ते चेतक फेस्टिवल साठी..
मात्र ते एका वेगळ्याच कारणाने आता चर्चेचा विषय ठरतंय..
ते म्हणजे या ठिकाणी असलेल्या तापी नदीवरील बेरीज च्या निर्माण झालेल्या या प्रश्नामुळे..
सारंगखेडा नदी तापी नदीवर मोठे बॅरेज बांधण्यात आले..
येथील वीज पुरवठा तांत्रिक अडचणींमुळे खंडित झाला
आणि दोन महिन्यांपासून 400 कोटींचा हा प्रकल्प अखेर अंधारात गेला..
त्यामुळे रात्रीची सुरक्षा व्यवस्था देखील ऐरणीवर आली… पावसाळ्यानंतर ११ मीटर पाणीसाठा आढळण्यात येतो
उन्हाळ्यात पाण्याची पातळी कमी होत जाते येथे सुविधांचा मोठा अभाव असल्याचं दिसून येतं..
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणिमहत्वपूर्ण माहिती ! त्यासाठी क्लिक कराआणिजॉईनकरा. https://bit.ly/36S6BFu
दोन ते तीन म्हणायचं प्रलंबित वीज बिल न भरल्यास वितरण कंपनी प्रकल्पाची वीज पुरवठा खंडित करते… गेल्या काही महिन्यांपासून 60000 रुपयांचे वीज बिल थकवल्याने वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केला..
त्यामुळे एक ना अनेक प्रश्न त्यातून निर्माण होऊ घातलेत..
येथील सामाजिक कार्यकर्ता अशोक कुवर यांनी एम.डी.टी.व्ही प्रतिनिधींची संवाद साधला ऐकूया ते नेमकं काय म्हणाले ..
यामुळे सुरक्षारक्षकांना त्यांचा पगार देखील वेळेवर मिळाला नाही
त्यामुळे सुरक्षारक्षक आपली उपजीविका कसे चालवणार हा प्रश्न निर्माण झालाय..
प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत मात्र तीन वर्षांपासून ते बंद आहेत
त्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळे सध्या ते धूळ खात आहेत..
असे एक ना अनेक प्रश्न लवकरात लवकर प्रशासनाने सोडवावेत हीच अपेक्षा..
गणेश कुवर ,सारंगखेडा ग्रामीण प्रतिनिधी, एम.डी.टी.व्ही. न्यूज सारंगखेडा