चोपडा /जळगाव :23/6/23
शिक्षक म्हणजे शिस्त क्षमा आणि कर्तव्य या त्रिसूत्रीचा मिलाप म्हणजे शिक्षक होतो.. अखंडपणे शिक्षण क्षेत्रात 33 वर्षे काम केल्यानंतर जेव्हा शासकीय नियमानुसार सेवेतून निरोप घेण्याची वेळ येते तेव्हा सर्वांचेच डोळे पाणवले जातात.. आणि तोच तो आपल्या जिवलग स्टाफ बरोबर निरोप घेण्याचा येतो वेळ.. तो असतो सेवापूर्ती सोहळा..
चोपडा तालुक्यातील बोर अंजटी येथील धनाजी नाना चौधरी आदिवासी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेचे शिक्षक विनोद पाटील यांचा सेवापुर्ती कार्यक्रम उत्साहात शाळेच्या आवारात संपन्न झाला
हे सुध्दा वाचा
Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS
नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली…
संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर भादले यांच्या अध्यक्षतेखाली हा सेवापूर्ती सोहळा पार पडला.. स्वर्गीय रायसिंग भादले यांच्या प्रतिमेला पूजन करून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली…उपाध्यक्षांच्या हस्ते विनोद पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र भादले यांनी देखील पाटलांचा सत्कार केला… संस्थेचे संचालक जितेंद्र भादले यांनी देखील विनोद पाटील यांचा सन्मान केला… दरम्यान या सोहळ्याला विनोद पाटील यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग असल्याने तालुक्यातील नागरिक विद्यार्थी पालक आणि नातेवाईक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते…
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
सत्रा सेन, उमर्टी, बोर अंजटी तसेच धानोरा येथील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते… शिक्षक विनोद पाटील यांच्या प्रति मुख्याध्यापक जगदीश महाजन, पत्रकार संजय सोनवणे, बडगुजर, आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले… सूत्रसंचालन विजय आखाडे यांनी केले..
आत्माराम पाटील ,चोपडा प्रतिनिधी, एम डी टी व्ही न्यूज जळगाव