राज्य पुरस्कारप्राप्त दोन्ही शिक्षकांचा विध्यार्थीसह गावकऱ्यानी केला गौरव
नंदुरबार : शाळेतून बदली झालेल्या शिक्षकांना चिमुकल्या विद्यार्थिनींसह माजी विद्यार्थिनींनी अनोख्या पद्धतीने निरोप दिला. विद्यार्थिनींसह पालकांनी कार्यक्रमाचे आयोजन करीत रनाळे जिल्हा परिषद कन्या शाळेत हा कार्यक्रम घडवून आणला.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या झाल्या आहेत. शिक्षकांना १५ मेपर्यंत नवीन शाळेत रुजू होण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहेत. नंदुरबार तालुक्यातील रनाळे जिल्हा परिषद कन्या शाळेतील मुख्याध्यापक अमृत पाटील व शिक्षिका उज्ज्वला पाटील यांचीदेखील दुसऱ्या शाळेवर बदली झाली आहे. त्यांनी येथील पदभार सोडण्यापूर्वीच शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
यावेळी जिल्हा परिषद सदस्या शकुंतला सुरेश शिंत्रे, सरपंच नलिनी ओगले, जितू ओगले, सुरेश शिंत्रे, गोकुळ नागरे, शरद तांबोळी, सुरेश भगुरे, लक्ष्मण नागरे, माधवराव नागरे आदी उपस्थित होते. चिमुकल्या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त करीत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत आपल्या भावनांना वाट करून दिली. स्वत:च फुलांचे गुच्छ तयार करून ते आपल्या प्रिय शिक्षकांना दिले.
याच शाळेत काम करीत असताना या दोन्ही शिक्षकांना राज्याचा आदर्श शिक्षक पुरस्कारदेखील मिळाला आहे. शिवाय जिल्ह्यातील पहिली डिजिटल शाळा करण्याचा मानदेखील याच शिक्षकांच्या सानिध्यात शाळेला मिळाला होता. अमृत पाटील व उज्ज्वला पाटील यांनीदेखील शाळा व गावाप्रती मनोगत व्यक्त करीत १२ वर्षांत शाळेचा कायापालट करण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राकेश घुगे, पंचायत समिती सदस्य भेगाबाई भिल, राकेश चौधरी, मिलिंद पवार, पंडित नागरे, रवींद्र भाबळ आदींसह अंगणवाडी सेविका, बचत गट सदस्या उपस्थित होत्या. संयोजन मंगेश वसावे, सूत्रसंचालन हेमराज भाबळ तर आभार दीपक पाटील यांनी मानले.
एम.डी.टी.व्ही. न्युज नंदुरबार