लोणखेडा कॉलेज गेटसमोर ही ऍम्ब्युलन्स पलटी झाली आहे. अपघातावेळी 13 गरोदर माता ऍम्ब्युलन्समध्ये होत्या. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
अपघातामध्ये जखमी झालेल्यांना शहादामधल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे. अतिदुर्गम भाग असलेल्या तेलखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रातले हे रुग्ण होते.
ऍम्ब्युलन्स पलटी झाल्यानंतर तिकडे उपस्थित असलेल्या नागरिकांनी ऍम्ब्युलन्समधून रुग्ण आणि गरोदर मातांना बाहेर काढलं. या ऍम्ब्युलन्सचा अपघात ड्रायव्हरचा ताबा सुटल्यामुळे झाला का अतिवेगामुळे झाला याचा तपास सुरू आहे.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
हे देखील वाचा:
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
13 गरोदर महिला व चालक पुरुष असे 14 जण अपघातात जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय .धडगाव अतिदुर्गम भागातील तेलखेडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील 13 गरोदर महिला सोनोग्राफी करून परतीचा प्रवास करत होते.
सर्व गरोदर मातेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली असून त्यांच्यावर उपचार सुरू असून रुग्णालयात नातेवाईकांनी धाव घेतली आहे.
संजय मोहिते,शहादा प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज ..


