पेसा क्षेत्रात स्थानिक बोली भाषेनुसार पदस्थापना मिळाल्याने शिक्षकांनी व्यक्त केले समाधान
अक्कलकुवा :- पेसा कायद्यांतर्गत बोली भाषेनुसार तालुक्यांतर्गत बदली न करता काही शिक्षकांची दुसऱ्या तालुक्यात बदली करण्यात आली होती. तालुक्यांतर्गत बदली होण्यासाठी काही शिक्षकांनी औरंगाबात खंडपीठात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशान्वये त्या सर्व शिक्षकांना तालुक्यांतर्गत पदस्थापना देण्याचे आदेश धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
याबाबात याचीकाकर्ते घनश्याम सुभाष बहिरम (रा.साक्री, जिल्हा धुळे) यांनी सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई, विभागीय आयुक्त नाशिक, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) धुळे यांच्याविरुद्ध जिल्हा परिषद धुळे अंतर्गत पेसा आदिवासी क्षेत्रात साक्री तालुक्यात बदलीची पदस्थापना देण्यासाठी तसेच संबंधित निवेदनावर निर्णय घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ येथे रिट याचिका एड.गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) यांच्यामार्फत दाखल केली होती.
हे सुध्दा वाचा
बापरे… पुण्यात पुन्हा एका मुलीवर जीवघेणा हल्ला…! | MDTV NEWS
Good News… नंदुरबार पालिकेच्या पाच शाळा झाल्या डिजिटल….! | MDTV NEWS
Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS
याचिकाकर्ते हे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. याचिकाकर्ते यांची विभिन्न तालुक्यातून शिरपूर तालुका येथे बदली करण्यात आली होती. याचिकाकर्ते हे मूळचे साक्री तालुका, जिल्हा धुळे येथील स्थानिक रहिवासी आहेत. याचिकाकर्ते हे कोकणी जमातीचे असून त्यांना अनुसूचित जमाती म्हणून मान्यता देण्यात आली आहे. कोकणी ही त्यांची मुख्य भाषा आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
साक्री तालुक्यात कोकणी जमातीची लोकसंख्या प्रचंड आहे. बहुतांश विद्यार्थ्यांना सुद्धा कोकणी भाषा ही अवगत आहे. सामान्य प्रशासन विभाग यांनी पेसा कायद्यांतर्गत अनुसूचित क्षेत्रातील पदे स्थानिक उमेदवारांमधून भरण्याच्या अनुषंगाने व जिल्ह्यांतर्गत करण्यात येणाऱ्या बदलीबाबत मार्गदर्शक सूचना शासन निर्णयाद्वारे प्रसिद्ध केलेल्या आहेत. याचिकाकर्ते यांनी वेळोवेळी पाठपुरावाही केला होता. परंतू कुठलाही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला नव्हता. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठचे न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे व न्यायमूर्ती संजय ए. देशमुख यांनी आदेशान्वये माननीय शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद धुळे, यांना सदर निवेदनावर कायद्यानुसार तसेच उपलब्ध रिक्त पदांनुसार निर्णय घेण्याचे महत्त्वपूर्ण आदेश पारित केले होते.
हे सुध्दा वाचा
बापरे… पुण्यात पुन्हा एका मुलीवर जीवघेणा हल्ला…! | MDTV NEWS
Good News… नंदुरबार पालिकेच्या पाच शाळा झाल्या डिजिटल….! | MDTV NEWS
Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धुळे यांनी काही याचिकाकर्ते यांना शासन निर्णयानुसार व मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ यांच्या निर्णयानुसार स्थानिक पेसा क्षेत्रात बोली भाषेनूसार साक्री तालुक्यात पदस्थापना देण्याचे महत्त्वपूर्ण आदेश पारित केले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याचिकाकर्ते यांना शासन निर्णयानुसार व मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ यांच्या निर्णयानुसार स्थानिक पेसा क्षेत्रात बोली भाषेनूसार साक्री तालुक्यात पदस्थापना देण्याचे महत्त्वपूर्ण आदेश पारित केलेले आहे. याचीकाकर्त्यांतर्फे एडवोकेट गजेंद्र देवीचंद जैन (भंसाली) यांनी काम पाहिले.
शुभम भन्साली. एमडीटीव्ही न्युज ब्युरो, अक्कलकुवा.