मृत्यूशी झुंज संपली .. सृष्टी आणि रंजनाला वाचविण्यात अपयश !

0
3047

सिहोर जिल्ह्यात तीन दिवसांपासून ३०० फूट खोल बोअरवेलमध्ये अडलेल्या चिमुकलीला वाचवण्यात बचाव पथकाला अपयश आले आहे. सृष्टी कुशवाह नावाची ३ वर्षीय चिमुकली मंगळवारपासून बोअरवेलमध्ये अडकली होती. स्थानिक प्रशासनासह एसडीआरएफ आणि लष्कराचे पथक बचाव तिला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. गेल्या ४८ तासांपासून हे रेस्क्यू ऑपरेशन (rescue operation) राबविण्यात आले. गुरुवारी सकाळी या चिमुकलीला वाचवण्यासाठी रोबोटिक एक्सपर्टला बोलावण्यात आले. यानंतर तिला बाहेर काढून तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

07e6af4c 8f7d 4b1d a6b0 7edd7ad00a91

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

मध्य प्रदेशच्या सीहोर जिल्ह्यातल्या मुंगावली येथे राहणारी तीन वर्षांची सृष्टी खेळता खेळता अचानक शेतातील बोअरवेलमध्ये पडली. ती जेव्हा बोअरवेलमध्ये पडली त्यावेळी ती २० फूटावर अडकली होती. पण ती १०० फूटांपर्यंत खाली गेली. त्यामुळे तिला वाचवण्यासाठी अडचणी आल्या. सृष्टीला पाईपच्या सहाय्याने ऑक्सिजन दिला गेला. सृष्टीला वाचवण्यासाठी एनडीआरएफची टीम, भारतीय लष्कराचे जवान आणि स्थानिक प्रशासनाच्या टीमकडून अथक प्रयत्न करण्यात आले.

हे सुध्दा वाचा:

BIG BREAKING… मान्सूनचा प्रवासात चक्रीवादळाचा खोडा ! – MDTV NEWS

साक्षी हत्याकांडतील आरोपींवर तात्काळ कारवाई करा – MDTV NEWS

३०० फूट खोल बोअरवेलमध्ये सृष्टी १२० फूटांवर अडकली. ती अडकल्याची माहिती मिळताच बचाव पथक तिला वाचवण्यासाठी आले. प्रथम स्थानिक प्रशासनाने तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर बुधवारी दुपारपासून लष्कराने बवाच मोहिम हाती घेतली. मुलीला वाचवण्यासाठी समांतर खड्डा खोदण्यात आला. तो प्रयत्नही अयशस्वी झाल्यावर बचावासाठी पारंपरिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला.रॉडद्वारे बोअरवेलमध्ये हुक घातला. सृष्टीला वाचवण्यासाठी रेस्क्यू टीम कॅमेऱ्यावर नजर ठेवून होती. खडकाळ जमीन असल्याने खोदकाम करताना खूप अडचणी येत होत्या. कॅमेऱ्यात मुलीची कोणतीही विशेष हालचाल दिसत नव्हती. मुलीला हुकद्वारे बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. रोबोटिक कॅमेऱ्यानंतर लष्कराने रॉडला हुक लावून बवाच सुरू केला. एसपी मयंक अवस्थी स्वतः संपूर्ण बचाव कार्याचे नेतृत्व करत होते. अखेर तिला बाहेर काढले, तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिचा मृत्यू झाला आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

दरम्यान, बिहारमध्ये १२ वर्षांचा मुलगी रंजना पुलाच्या पिलरमध्ये अडकल्याची घटना घडली. दोन दिवसांपासून रंजना बेपत्ता होती. तिला शोधत असताना ती रोहतासच्या सोन नदीच्या पुलामध्ये अडकल्याचे दिसून आले. स्थानिक प्रशासनाकडून या मुलीला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान या बालिकेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, इंदोर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here