नंदुरबार : ४/३/२०२३
नंदुरबार शहरातील एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता…
पुण्यातील आरोपी चंद्रशेखर भस्मे राहणार नंदुरबार याला 11 नोव्हेंबर 2019 रोजी अटक करण्यात आली होती..
नंदुरबार शहर पोलीस उपनिरीक्षक प्रियदर्शनी थोरात यांनी सदर गुन्ह्याचा शास्त्रोक्त पद्धतीने तपास करीत महत्त्वाचे पुरावे हाती मिळवले..
दोषारोप पत्र माननीय मुख्य न्याय दंडाधिकारी नंदुरबार यांच्या न्यायालयात सादर करण्यात आलं..
मुख्य न्याय दंडाधिकारी नंदुरबार विनोद चव्हाण यांनी जबाब पंच आणि पुरावे तपास अधिकारी यांची साक्ष यांचा विचार करून भस्मे या तीन वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली…
सदर गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख पी आर पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रियदर्शनी थोरात यांनी केला..
सहाय्यक सरकारी अभियोगता एडवोकेट सुनील पाडवी यांनी खटल्याचं कामकाज पाहिलं..
तपास अधिकारी आणि त्यांचे पथक आणि विशेष सरकारी वकील यांचं नंदुरबार जिल्हा पोलीस प्रमुखांनी कौतुक केलं.. आणि अभिनंदनही केलं..
प्रवीण चव्हाण नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी एम.डी .टी.व्ही न्यूज